कोरोनाचा फेसबुकला फटका, शांघाय नंतर 'हे' ऑफिस देखील राहणार बंद...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

कोरोना जगभरात प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो नागरिकांनी जीव गमावलाय. चीननंतर आता हळूहळू जगातल्या सगळ्याच देशांवर कोरोनाचं सावट पसरत चाललं आहे. जगातल्या काही मोठ्या कंपन्यांनाही आता कोरोनाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. यात फेसबुकलाही मोठा फटका बसला आहे. 

कोरोना जगभरात प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो नागरिकांनी जीव गमावलाय. चीननंतर आता हळूहळू जगातल्या सगळ्याच देशांवर कोरोनाचं सावट पसरत चाललं आहे. जगातल्या काही मोठ्या कंपन्यांनाही आता कोरोनाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. यात फेसबुकलाही मोठा फटका बसला आहे. 

हेही वाचा: 'वर्षा'च्या भिंतींवर 'त्या' मजकूराबद्दल अमृता फडणवीस म्हणतात..... 

कोरोनामुळे फेसबुकवर चक्क पूर्ण कंपनी बंद बंद ठेवण्याची वेळ आली आहे. काही दिवसांआधी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय कंपनीला आला. हा संसर्ग पसरू नये म्हणून फेसबुक कंपनीनं काही दिवसांसाठी ऑफिस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फेसबुकनं काही दिवसांसाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे.

आधीच शांघायमधील फेसबुक कार्यालय कंपनीनं अनिश्चित काळासाठी बंद ठेवलंय. त्यानंतर फेसबुकनं सिंगापूर इथलं कार्यालयही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती. मात्र आता लंडनच्या फेसबुक कार्यालयातही संशयित आढळल्यामुळे  कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 

हेही वाचा: धावत्या लोकलवर फुगे फेकल्यास होणार कारवाई !

१३ मार्चपर्यंत हे फेसबुकचं कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कार्यलयाची योग्य ती पूर्ण स्वच्छता केली जाणार आहे, असं कंपनीकडून सांगण्यात येतंय. दरम्यान तोपर्यंत कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचे आदेश कंपनीकडून देण्यात आले आहेत. फेसबुकसारख्या मोठ्या कंपनीत अनेक जण काम करतात. त्यात काही भारतीयही आहेत. कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसमुळे काहीही होऊ नये म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत स्वछतेचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कार्यलयात न येणाच्या सल्ला कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. 

Facbook london ofice will remain close for next few days due to corona threat


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facbook london ofice will remain close for next few days due to corona threat