चर्चमध्ये ब्रिटीश खासदाराला भोसकणं हे दहशतवादी कृत्य - यूके पोलीस

"इस्लामिक कट्टरतावाद या हत्येशी संबंधित असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे"
चर्चमध्ये ब्रिटीश खासदाराला भोसकणं हे दहशतवादी कृत्य - यूके पोलीस

लंडन: ब्रिटनचे अनुभवी खासदार (British lawmaker) सर डेव्हिड एमेस (David Amess) यांची काल हत्या झाली. मतदारसंघात एका बैठकीसाठी गेलेले असताना, एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डेविड एमेस यांचा मृत्यू झाला. डेव्हिड एमेस यांची भोसकून हत्या करण्यात आली. हे दहशतवादी कृत्य असल्याचं दहशतवाद विरोधी पथकातील पोलिसांनी म्हटलं आहे.

"इस्लामिक कट्टरतावाद या हत्येशी संबंधित असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे" न्यू स्कॉटलंड यार्डमधील मेट्रोपोलिटन पोलिसांनी स्टेटमेंटमधुन ही माहिती दिली. आरोपीने एकट्याने हे कृत्य केल्याचा तपास यंत्रणांना विश्वास आहे. त्यामुळे या प्रकरणात सध्या त्यांना अन्य कोणालाही ताब्यात घ्यायचे नाहीय.

चर्चमध्ये ब्रिटीश खासदाराला भोसकणं हे दहशतवादी कृत्य - यूके पोलीस
मुलाला गिफ्ट देताय? जाणून घ्या आयकर विभागाच्या मर्यादा

डेव्हिड एमेस हे ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या पक्षाचे खासदार होते. एका नियमित बैठकीत ते स्थानिकांशी बोलत असतानाच बेलफेयर मेथोडिस्ट चर्चमध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकू हल्ला केला.

चर्चमध्ये ब्रिटीश खासदाराला भोसकणं हे दहशतवादी कृत्य - यूके पोलीस
NCB योद्धा झाल्यानं मलिकांना मिरची का झोंबली? फ्लेचर पटेल यांचा सवाल

डेव्हिड एमेस हे साऊथएन्ड एसेक्स मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करायचे. हल्लेखोर मतदारांसोबत चर्चा करण्याच्या बहाण्याने तिथे आला होता. घटनास्थळावर पोलीस आल्यानंतर त्यांनी २५ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चाकू ताब्यात घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com