Video: हॉटेलमध्ये बायकांची फायटिंग, दोघींना जाम धुतले… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

video

Video: हॉटेलमध्ये बायकांची फायटिंग, दोघींना जाम धुतले…

महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही अचंबित करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येणार. या व्हिडिओमध्ये एक महिला दोन महिलांना बेदम मारताना दिसत आहे. (fighting video of woman beating two women in restaurant goes viral)

हा व्हिडीओ एका रेस्टॉरंटमध्ये एक महिलेचा दोन महिलेशी वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात मारपीट झाली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

हि महिला सुरुवातीला दोन महिलेचं शांतपणे एकूण घेतलं. नंतर तिचा पारा इतका चढला की तीने चक्क एकटीने त्या दोन महिलेला चांगलेच चोपले. सुरवातीला हि महिला शांत असते आणि भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न करते मात्र नंतर त्या दोन महिला या महिलेला असं काही म्हणतात की ती त्या दोघींची चांगलीच धूलाई करते.

हि महिला प्रोफेशनल फायटर असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. कारण ज्या पद्धतीने महिलेने त्या महिलांना मारले त्यावरुन दिसून येते. रेस्टॉरंटमधील काही लोक धावली आणि ही मारपीट थांबवली.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.