व्हाइट हाउसमध्ये  १२ भारतीय अमेरिकी

व्हाइट हाउसमध्ये  १२ भारतीय अमेरिकी

वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष ज्यो बायडेन हे येत्या २० रोजी पदाची शपथ घेणार आहेत. बायडेन यांच्या रूपाने अमेरिकेची सत्ता पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाकडे  आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बायडेन यांच्या  मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या अमेरिकी नेत्यांची संख्या लक्षवेधक आहे. व्हाइट हाउसमध्‍ये या वेळी प्रथमच भारतीय वंशांचे १२ उच्चपदस्थ दिसणार आहेत. यातील काहींनी माजी अध्यक्ष बराक ओमाबा यांच्याबरोबरही काम केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे.

नीरा टंडन
व्हाइट हाउसच्या व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या संचालिका. 
अनेक मध्यवर्ती संस्थांच्या अर्थसंकल्पांची जबाबदारी.

डॉ. विवेक मूर्ती
आरोग्य विभागात सर्जन जनरलपदी नियुक्ती.
वैद्यकीय व संशोधन क्षेत्रात २० वर्षांचा अनुभव. नौदलातील सार्वजनिक आरोग्य सेवा तुकडीचे माजी व्हाइस ॲडमिरल.
अमेरिकेतील कोरोनाव्हायरसच्या साथीचा प्रभाव कमी करण्याचे आव्हान.

वनिता गुप्ता
सहाय्यक ॲटर्नी जनरल
न्यूयॉर्क विद्यापीठातील विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी.
‘अमेरिकेतील सर्वांत आदरणीय नागरी हक्क वकील’, अशा शब्दात बायडेन यांच्याकडून कौतुक.

सुमोना गुहा
राष्ट्रीय आर्थिक परिषदेत दक्षिण आशिया विभागाच्या वरिष्ठ संचालक.
अल्ब्राईट स्टोनब्रीज ग्रुपच्या वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने युरोप व दक्षिण आशियातील बाजारपेठेविषयी मार्गदर्शनाचा दीर्घ अनुभव.
परराष्ट्र विभागातील माजी अधिकारी.

गौतम राघवन
भारतात जन्म.
अध्यक्षीय कार्यालयात उपसंचालकपदी निवड. 
अमेरिकेचे राजकीय सल्लागार म्हणून कामाचा अनुभव. 

भारत राममूर्ती
राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक. आर्थिक सुधारणा आणि ग्राहक संरक्षणाची जबाबदारी.
हॉर्वर्ड महाविद्यालय व येल विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी.
रुझवेल्ट इन्स्टिट्यूटमध्ये उद्योग ऊर्जा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक.

सब्रिना सिंग
माध्यम विभागाच्या उपमंत्रीपदाची जबाबदारी.
बायडेन-कमला हॅरिस यांच्या प्रचारात जनसंपर्काची जबाबदारी.
डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या जनसंपर्क उपसंचालक. 

तरुण छाब्रा
तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे वरिष्ठ संचालक म्हणून शपथ घेणार.
ऑक्सफर्ड, हॉर्वर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठाचे विद्यान माजी विद्यार्थी.
पेंटागॉनमध्ये संरक्षण मंत्र्यांचे भाषणलेखक म्हणून काम केले आहे.

आयशा शाह
काश्‍मीरमध्‍ये जन्म
डिजिटल धोरण विभागात ‘पार्टनरशिप मॅनेजर’
बायडेन-कमला हॅरिस यांच्या डिजिटल प्रचाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

विनय रेड्डी
बायडेन यांचे भाषणलेखन संचालक.
बायडेन उपाध्यक्ष असताना त्यांचे मुख्य  भाषणलेखक होते. 
ओबामा यांच्या कार्यकाळानंतर नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या संपर्कविभागाचे प्रमुख होते.

वेदांत पटेल
गुजरातमधील जन्म.
माध्यम विभागाचे सहाय्यक मंत्री म्हणून शपथ घेणार.
सध्या बायडेन- हॅरिस यांच्या अध्यक्षीय पदग्रहण समितीचे वरिष्ठ प्रवक्ते आहेत.

शांती कलातील
लोकशाही आणि मानवी हक्क विभागाचे समन्वयक म्हणून जबाबदारी.
यूसी बर्कले आण ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या माजी विद्यार्थिनी.
जागतिक बँकेच्या सल्लागार होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com