David Cameron: माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांची पुन्हा राजकीय एन्ट्री; सुनक सरकारमध्ये मिळालं महत्त्वाचं पद

कॅमरुन यांची ब्रिटिश राजकारणात पुन्हा झालेली एन्ट्री आश्चर्यकारक आहे. गेल्या सात वर्षांपासून ते आपल्या व्यवसायाच्या कामात गुंतले होते. तसेच त्यांच्या प्रभाव कमी होत असल्याची चर्चा सुरु झाली होती.
David Cameron
David Cameron

लंडन- यूकेमध्ये दिवसभरात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांची अनपेक्षितपणे पुन्हा एकदा ब्रिटिश सरकारमध्ये एन्ट्री झाली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारमध्ये त्यांना परराष्ट्र सचिव करण्यात आलं आहे. दुसरीकडे उजव्या विचारसरणीच्या नेत्या सुईला ब्रेव्हरमन (Suella Braverman) यांची गृहमंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

पुढील वर्षी ब्रिटनमध्ये निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर ऋषी सुनक यांनी आपल्या टीमध्ये मोठे बदल केले असल्याचं बोललं जातं. सुईला ब्रेव्हरमन यांची जागा जेम्स क्लॅवरी यांनी घेतली आहे. याआधी जेम्स क्लॅवरी हे परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या जागी डेव्हिड कॅमेरुन यांना संधी देण्यात आली आहे. (Former UK leader David Cameron sensationally returned to the British government as foreign secretary Rishi Sunak)

David Cameron
ग्रेट ब्रिटन, इंग्लंड की यूके? देशाचं नाव नेमकं कोणतं?

५७ वर्षीय कॅमरुन यांना ब्रेग्झिट सार्वमतानंतर पायउतार व्हावं लागलं होतं. २०१० ते २०१६ या कार्यकाळात ते ब्रिटनचे पंतप्रधान होते. नियुक्तीनंतर डेव्हिड कॅमेरुन यांनी प्रतिक्रिया दिली. काही निर्णयांबाबत माझे विचार वेगळे असू शकतात. पण, सुनक हे एक मजबूत आणि सक्षम प्रधानमंत्री आहेत. ब्रिटन सध्या आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करत आहे. अशात त्यांची झालेली नियुक्त महत्त्वाची मानली जात आहे.

कॅमरुन पुढे म्हणाले की, त्यांना कंझर्वेटिव्ह नेता म्हणून ११ वर्षे आणि पंधानमंत्री म्हणून ६ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांचा हा अनुभव देशासमोर असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी फायदाचा ठरेल. विशेष म्हणजे डेव्हिड कॅमेरुन हे ब्रिटिश संसदमध्ये निवडले गेलेले नेते नाहीत. किंग चार्ल्स यांनी डेविड यांना ब्रिटनच्या वरिष्ठ सभागृहात स्थान देण्यास मंजुरी दिल्याचं सुनक यांच्या ऑफिसमधून सांगण्यात आलंय.

David Cameron
Israel-Hamas: 'तुमच्यासोबत असल्याचा अभिमान आहे'; जो बायडेननंतर आता ऋषी सुनक पाठिंबा द्यायला इस्राइलमध्ये

राजकीय एन्ट्री

कॅमरुन यांची ब्रिटिश राजकारणात पुन्हा झालेली एन्ट्री आश्चर्यकारक आहे. गेल्या सात वर्षांपासून ते आपल्या व्यवसायाच्या कामात गुंतले होते. तसेच त्यांच्या प्रभाव कमी होत असल्याची चर्चा सुरु झाली होती. असे असताना त्यांच्या पुन्हा झालेल्या राजकीय एन्ट्रीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com