सेकंड हॅण्ड बूट विकून झाली लखपती; 9 हजाराचे केले 9 लाख! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shoes selling idea
सेकंड हॅण्ड बूट विकून झाली लखपती; 9 हजाराचे केले 9 लाख!

सेकंड हॅण्ड बूट विकून झाली लखपती; 9 हजाराचे केले 9 लाख!

Business Idea: व्यवसाय करणारी लोकं आपला व्यवसाय वाढावा यासाठी विविध कल्पना योजत असतात. त्यानुसार ते व्यवसाय कसा वाढवावा याचा आढावा घेतात. काही लोकांना व्ववसाय वाढविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. तर काहींना ते लगेच जमते. अशाच एका महिलेच्या व्यावसायिक आयडियेमुळे ती रातोरात लखपती झाली आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! PM Kisan e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली

द सन ने याबाबत वृत्त दिले आहे. प्रेप नावाच्या टिकटॉकरने सोशल मीडियावर तिच्या व्यवसायाची आयडिया शेअर केली आहे. महत्वाचे म्हणजे या आयडियाने ही मुलगी 9 हजारांपासून 9 लाख रुपयांची मालकिण बनली आहे. या महिलेने व्यवसायाच्या सोप्या युक्त्या लोकांसोबत शेअर केल्या आहेत.तिने सांगितले की, जेव्हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला तेव्हा तिने फक्त बूट खरेदी आणि विक्री करायचे ठरवले. जेणेकरून ती कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकेल. त्यानंतर तिने आपल्या व्यवसायातील कमाई शंभर पटीने वाढवली. तिने पहिल्यांदा काही ब्रँडेड शूज सेकंड हँड विकत घेतले. त्यांना निटनेटके करून तिनेच त्यांची वेगळी किंमत निश्चित केले. त्यानंतर महिलेने ते शूज चांगल्या किंमतीत विकले.

हेही वाचा: १२ वर्ष तो जेवलाच नाही; चक्क खातोय दगड!

Tsandals

Tsandals

काही दिवसात १०० पटीने वाढला व्यवसाय

अशा पद्धतीने काम केल्याने माझा व्यवसाय नऊ हजारांवरून नऊ लाखांपर्यंतचा गेला. सर्वात आधी तिने वापरलेल्या निळ्या जॉर्डन ट्रेनर शूजची जोडी 9 हजाराला विकत घेतली. त्यानंतर ते जोडे पूर्णपणे साफ करून साडेपंधरा हजार रुपयांना विकले. अशाचप्रकारे दुसऱ्या ब्रॅण्डचे सेकंड हेण्ड जोडे खरेदी करून त्यावर ४ ते ५ हजारांचा फायदा मिळवला. त्याच पद्धतीने ती आता जुने सेकंड हँड शूज खरेदी करेल आणि ते दुप्पट-तीनपट किमतीला विकेल. अशा प्रकारे आज ती करोडपती झाली आहे.

हेही वाचा: सकाळी शाळेला जायला पोरगं कुरकुर करतंय! या Tips वापरून उठवा

Web Title: Girl Became Lakhpati With Second Hand Shoes Know How Business Reached From 9 Thousand To 9 Lakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Businessbusiness idea