सकाळी शाळेला जायला पोरगं कुरकुर करतंय! या Tips वापरून उठवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child-to-wake-up-for-school
सकाळी शाळेला जायला पोरगं कुरकुर करतंय! या Tips वापरून उठवा

सकाळी शाळेला जायला पोरगं कुरकुर करतंय! या Tips वापरून उठवा

दोन वर्षांनंतर मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या आधीची दिनचर्या पुन्हा सुरू झाली आहे. पण या दोन वर्षात मुलांच्या अनेक सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे पुन्हा जुनीच सवय मुलांना लावताना पालकांच्या नाकीनऊ येत आहेत. शाळेसाठी मुलांना लवकर उठवणे हे अनेक पालकांना जड जाते. कितीही प्रयत्न केला तरी मुलं उठत नाहीत. त्यांना अनेक प्रकारे उठवण्याचे प्रयत्न केले जातात. पण त्यात अनेकांना अपयश येतं. रात्री वेळेत मुलं झोपलं नाही तर साहजिकच उठायला कुरकुर करतात. त्यामुळे तुम्हाला मुलगा वेळेत झोपण्यासाठी काही टिप्स वापराव्या लागतील. त्या वापरून शाळेत जाण्यासाठी तुम्ही त्याला लवकर उठवू शकाल.

हेही वाचा: पालकांनो, मुलांना झोपेची शिस्त लावा! वाचा अभ्यास काय सांगतो

Playing

Playing

१) खेळण्याचा क्लास लावा- मुलं थकत नसल्याने रात्री त्यांना लवकर झोप येत नाही. त्यामुळे त्यांना घराजवळ क्रिकेट, स्केटिंग, चेस अशाप्रकारच्या क्लासेसला पाठवा. त्यामुळे तुमचा मुलगा थकेल आणि त्याला लवकर झोप येईल. तसेच सकाळीही झोप पूर्ण झालेली असेल. त्यामुळे मुलगा सकाळी उठायला कुरकुर करणार नाही.

२) दुपारी झोपू देऊ नका- अनेक मुलं दुपारी झोपतात. तेव्हा त्यांची झोप पूर्ण होते. त्यामुळे साहजिकच रात्री लवकर झोप येत नाही. मग सगळं चक्र बिघडतं. म्हणूनच तुम्ही मुलाला दुपारी झोपायला देऊ नका. म्हणजे तो रात्री लवकर झोपेल आणि सकाळी उठायला त्याला अडचण येणार नाही.

हेही वाचा: Homework Tips: पालकांनो, मुलांचा अभ्यास सोपा करायचाय! चार गोष्टी पडतील उपयोगी

Sleep children

Sleep children

३) दिनचर्या ठरवा- मुलांची दिनचर्या ठरवणे खूप गरजेचे आहे. सुट्टीच्या काळातही ती बदलणारन नाही याची काळजी घ्या. हे करणे आवश्यक आहे कारण मुलांना सवय लागली की मुले आपोआप वेळेवर उठतात. सुट्टीच्या दिवशीही सवयी बदलली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या.

४) ८ तासांची झोप गरजेची - मुलांसाठी ८ ते १० तासांची झोप खूप गरजेची आहे. तुम्ही मुलाला रात्री लवकर झोपवायचा प्रयत्न करा. म्हणजे त्याची झोप पूर्ण होईल. त्यामुळे सकाळी त्याला फ्रेश वाटेल.

५) अलार्म लावा- मुलांच्या खोलीत अलार्म लावा. सकाळी अलार्म लाऊन उठण्याची त्यांना सवय लावा. म्हणजेच अलार्म वाजल्यावर ते उठतील. आणि रात्रीही अलार्मच्या भितीने लवकर झोपतील.

हेही वाचा: ८ तास झोपणे महत्वाचे नाही! झोपेची गुणवत्ता ठरते महत्वाची| Study