Artificial Intelligence : "मला पश्चाताप होतोय..."; AI मधल्या धोक्यांच्या भीतीने गॉडफादरचा राजीनामा

त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांपैकी एक जण Chat GPT चा निर्माता आहे.
Artificial Intelligence
Artificial IntelligenceSakal
Updated on

जगात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भूमिका मोठी होत असताना त्याचे धोकेही समोर येत आहेत आणि तज्ज्ञांनी त्याबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे. 'कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)'चे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनी गेल्या आठवड्यात गुगलचा राजीनामा दिला. त्यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याने विकसित करण्यात मदत केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्यांबद्दल बोलण्यासाठी हिंटनने नोकरी सोडली.

न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या निवेदनात, हिंटनने Google मधून राजीनामा देण्याची घोषणा केली आणि ते म्हणाले की "त्याला आता त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे". हिंटन यांनी ट्विट केलं आहे की त्यांनी Google मधील नोकरी सोडली जेणेकरून ते AI च्या जोखमींबद्दल उघडपणे बोलू शकतील. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'AI च्या धोक्यांवर बोलता यावे आणि गुगलवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून मी नोकरी सोडली. Google ने अतिशय जबाबदारीने काम केलं आहे.

Artificial Intelligence
Artificial Inteligence : तुमच्या वैयक्तीक आयुष्यात आग लावू शकतो AI, इंटरनेटवर डीपफेक पॉर्नचा पूर...

नुकत्याच झालेल्या BBC च्या मुलाखतीत ते म्हणाले, 'मला काही धोके दिसतात आणि त्यातील काही भीतीदायक आहेत त्याबद्दल मी आता उघडपणे बोलू शकतो. सध्या, मी सांगू शकतो, AI माणसापेक्षा जास्त बुद्धिमान नाहीत. पण मला वाटतं की ते लवकरच होऊ शकतात." हिंटन यांनी एक दशकाहून अधिक काळ Google साठी काम केले आणि ते क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठितांपैकी एक होते. टोरंटोमध्ये दोन पदवीधर विद्यार्थ्यांसोबत काम करताना २०१२ मध्ये त्यांनी AI मध्ये मोठी प्रगती केली होती.

Artificial Intelligence
Artificial Intelligence : खोटी कारणे सांगून ऑफिसमधून सुट्टी घेताय, सावधान...! आता AI ओळखणार चक्क आजार

न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, तिघांनी मिळून एक अल्गोरिदम तयार केला होता जो फोटोंचे विश्लेषण करण्यास सक्षम होता. त्याच्यासोबत प्रकल्पावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक आता OpenAI चे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे. त्यांनी बीबीसीला सांगितले की चॅटजीपीटीसारखे चॅटबॉट्स लवकरच मानवी मेंदूकडे असलेल्या माहितीची पातळी ओलांडू शकतात. AI ने नोकर्‍या काढून टाकल्याबद्दल आणि अनेक लोकांना 'सत्य काय आहे हे माहीत नाही, अशीही भीती वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.