अभिमानास्पद : सुंदर पिचाई यांच्याकडे आता गुगल 'अल्फाबेट'चीही जबाबदारी

टीम ई-सकाळ
Wednesday, 4 December 2019

कॅलिफोर्निया (अमेरिका) : भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर गुगलच्या अल्फाबेट या गुगलच्याच उपकंपनीचीही जबाबदारी सोपवण्यात आलीय. दोन्ही कंपन्यांना स्वतंत्र सीईओची गरज नसल्याचे सांगत गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जे बिन यांनी एका पत्राद्वारे ही घोषणा केली आहे. गेली 15 वर्षे सुंदर आपल्यासोबत काम करत आहे. तोच या जबाबदारीसाठी योग्य आहे, असं लॅरी आणि सर्जे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. सुंदर पिचाई मुळचे भारती असून, त्यांचा जन्म तमीळनाडूमध्ये मदुराई येथे झाला आहे. सध्या ते गुगलचे सीईओ म्हणून काम पाहत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय म्हणाले लॅरी आणि सर्जे?
लॅरी आणि सर्जे यांच्या पत्रात म्हटलंय की, गुगलही काही पारंपरिक पद्धतीने चालणारी कंपनी नाही आणि आपल्याला तशी कंपनी चालवायचीही नाही. नविण्याचा आणि आव्हानांचा स्वीकार करण्यावर आपण नेहमीच भर दिलाय. गुगलच्या सर्च इंजिन, जीमेल, यूट्यूब, मॅप्स, क्लाऊड, अँड्रॉईड या सेवांचा कोट्यवधी लोकांनी स्वीकार केलाय आणि त्या त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनल्या आहेत. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. चार वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 2015 रोजी अल्फाबेट ही गुगलची उपकंपनीची स्थापना झाली. गुगलची स्थापना 1998मध्ये मध्ये झाली. आज गुगल ही एक व्यक्ती असती तर, ती 21 वर्षांची असती आणि शिक्षणात पहिली ग्रेड त्यानं पास केली असती. पण, सध्या गुगल आणि अल्फाबेट नीट स्थिरावल्या आहेत आणि त्यांचाय योग्य पद्धतीने विस्तार होत आहे. अशा वेळी दोन्ही कंपनीला स्वतंत्र सीईओ आणि प्रेसिडेंटची गरज नाही. इथून पुढे गुगल आणि अल्फाबेट दोन्हीचे सीईओ सुंदर पिचाई असतील. 

आणखी वाचा - चिदंबरम यांना जामीन देताना कोर्टाच्या पाच अटी

आणखी वाचा - इस्रोला दोन दिवसांपूर्वीच सापडला होता विक्रम लँडर

सुंदर पिचाई काय म्हणाले? 
गेल्या पंधरा वर्षांत गुगलमध्ये काम करत असताना मी एकाच गोष्टीत सातत्य पाहिलंय तो म्हणजे बदल. मी 2004मध्ये पहिल्यांदा लॅरी आणि सर्जे यांना भेटलो होतो. त्यांच्या सल्ल्यांचा आजपर्यंत मला उपयोग होत आहे. त्यांच्यासोबत मी आणखी काम करणार आहे ही चांगली बातमी आहे. मला या नव्या जबाबदारी बद्दल एक स्पष्ट करायचं आहे की, यामुळे अल्फाबेटच्या सध्याच्या कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल होणार नाही. या नव्या जबाबदारीविषयी मी तितकचा उत्सुक आहे आणि आव्हान स्वीकारण्यास तयार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google ceo sundar pichai promoted as ceo company alphabet