मदत करणारा भारत ‘खरा मित्र’; अमेरिकेकडून स्तुती

पीटीआय
Sunday, 24 January 2021

दक्षिण आशियातील अनेक देशांना कोरोनाची लस पुरविल्याबद्दल भारताची स्तुती अमेरिकेने केली. जागतिक समुदायाला मदत करण्यासाठी त्यांच्या औषधनिर्माण क्षेत्राचा उपयोग करणारा भारत हा ‘खरा मित्र’ आहे, असे सांगत भारताचा सन्मान केला.

कोरोनावरील लस अन्य देशांना पुरविल्याने अमेरिकेकडून स्तुती 
वॉशिंग्टन - दक्षिण आशियातील अनेक देशांना कोरोनाची लस पुरविल्याबद्दल भारताची स्तुती अमेरिकेने केली. जागतिक समुदायाला मदत करण्यासाठी त्यांच्या औषधनिर्माण क्षेत्राचा उपयोग करणारा भारत हा ‘खरा मित्र’ आहे, असे सांगत भारताचा सन्मान केला.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आणि पश्‍चिम आशिया विभागाने यासंदर्भात शुक्रवारी ट्विट केले आहे. ‘‘दक्षिण आशियायी देशांना कोरोनावरील लशीचे लाखो डोस पुरविणाऱ्या भारताच्या भूमिकेची आम्ही प्रसंशा करतो. मालदीव, भूतान, बांगलादेश आणि नेपाळला भारताने मोफत लशी दिल्या आहेत. अन्य देशांनाही लस पुरविली जाणार आहे. त्यांचे औषध जागतिक समुदायाला देऊन मदत करणारा भारत हा ‘खरा मित्र’ आहे,’’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सौदी अरेबियास दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि मोरोक्को या देशांनाही भारत व्यापारी तत्त्वावर लशींचा पुरवठा करणार आहे. कोराना व्हायरसपासून मुक्तता मिळविण्यासाठी शेजारील देशांना मदत करण्याचे भारताच्या प्रयत्नांचे कौतुक आहे. कोरोनासारख्या जागतिक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी प्रादेशिक आणि वैश्‍विक अशा दोन्ही पातळीवरील उपायांची गरज असते, असे परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष ग्रेगोरी मिक्स यांनी सांगितले.

WHO ने पुन्हा केलं भारताचं कौतुक; मानले पंतप्रधान मोदींचे आभार 

‘कोरोनाचा नवा प्रकार घातकच’
लंडन - ब्रिटनमध्ये गेल्या वर्षाच्या अखेरीस आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार जास्त घातक ठरु शकतो, असे प्राथमिक पुराव्यातून आढळले असल्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी सांगितले. न्यू अँड इमर्जिंग रेस्पिरेटरी व्हायरस थ्रेट्स ॲडव्हायझरी ग्रुपच्या शास्त्रज्ञांनी सुरुवातीला दिलेल्या माहितीच्या आधार घेत कोरोनाचा नवा प्रकार जास्त हानिकारक होऊ शकतो आणि त्यामुळे मृतांची संख्याही वाढू शकते, ही बाब जॉन्सन यांनी मान्य केली.

मंगोलियात बाळासह महिलेला रुग्णालयाने काढलं बाहेर; आंदोलनानंतर पंतप्रधानांनी दिला राजीनामा

कोरोनाच्या साथीविरोधात लढण्यासाठी भारताने जागतिक समुदायाला जे समर्थन दिले आहे, त्याची दखल घेतल्याबद्दल आणि जागतिक पातळीवर आरोग्य गरजा पुरविण्यासाठी भारत हा दीर्घकाळ विश्‍वासू भागीदार असल्याचा सन्मान केल्याबद्दल देश तुमचे मनापासून आभार मानत आहे. 
- तरणजितसिंग संधू, भारताचे अमेरिकेतील राजदूत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping India True Friend America