चीनने कशाप्रकारे covid-19 महामारीला हरवले? जाणून घ्या सर्वकाही...

Covid19
Covid19

बिजिंग - कोरोना विषाणूने जगभरात असामान्य आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3.53 लाखांपर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेसारख्या आर्थिक महासत्ता असलेल्या देशामध्ये तर हाहाकार माजला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूने 1 लाखांपेक्षा अधिक बळी घेतले आहेत. मात्र, जेथे या विषाणूचा प्रसार झाला त्या चीनने कोरोनाची साथ आटोक्यात आणली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चीनच्या वुहान शहरात डिसेंबरच्या शेवटी covid-19 चा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा विषाणू संपूर्ण वुहान शहरात पसरला. चीनच्या इतर भागातही या विषाणूने हातपाय पसरले. थोड्याच दिवसात जगभरात कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले. चीनमध्ये आतापर्यंत 82,955 कोरोना बाधित सापडेल आहेत. त्यातील 4634 जणांचा बळी गेला असून एकूण 78,291 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. मार्च महिन्यापासून नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत गेले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण सापडणे जवळजवळ बंद झाले आहे. 

147 कोटी लोकसंख्या असलेल्या चीनने कोरोना विषाणूला कशाप्रकारे अटोक्यात आणले हा अभ्यासाचा विषय बनला आहे. चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांनी या काळात कोणत्या उपाययोजना राबवल्या याबाबत एका आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

वुहान ही हुबेई प्रांताची राजधानी आहे. वुहान शहरात जेव्हा कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला तेव्हा संपूर्ण यंत्रणा सक्रिय करण्यात आली. शहराची पूर्णपणे टाळेबंदी करण्यात आली. वुहानच्या रहिवाशांना शहराबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली. तसेच त्यांच्या शहरातील हालचालीही मर्यादीत करण्यात आल्या. फक्त जिवनावश्यक वस्तू आणि मेडिकल साहित्य यांचा पुरवढा शहराला बाहेरुन करण्यात आला.

चीनसाठी हाँगकाँग का आहे महत्त्वाचं? चीनने असं करण्यामागं काय आहे खरं कारण?
 
हुबेई प्रातांची उपचार क्षमता कमालीची वाढवण्यात आली. इतर प्रांतातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी वुहानमध्ये कामाला लावण्यात आले. कमी काळात हजारो बेडची व्यवस्था करण्यात आली. कमी प्रमाणात लक्षणे असणाऱ्यांची व्यवस्था वेगळी करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची चाचणी घेण्यात आली. वुहानमधील सर्व 1.4 कोटी नागरिकांची चाचणी घेण्यात आली. 

टाळेबंदी वुहान शहरानंतर ह्युबई प्रातांत वाढवण्यात आली. त्यानंतर संपूर्ण देशात काही प्रमाणात टाळेबंदी लागू करण्यात आली. जीवनावश्यक वस्तुंनाच प्राधान्य देण्यात आले. गरज नसलेली सर्व दुकाने, उद्याने, चित्रपटगृहे, हॉटेल बंद करण्यात आली. लोकांना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली. एकमेकांत अंतर ठेवण्यास सांगण्यात आले. लोकांच्या एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. ठिकठिकाणी शरीराचे तापमान मोजण्याची यंत्रणा बसवण्यात आली. कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आल्यास त्याला रुग्णालयात ठेवण्यात आले. वुहान शहराला भेट देण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्तीला दोन आठवडे घरीच क्वारंटाईन करण्यात आले.

सरकारने जारी केलेले आदेश पाळणे बंधनकारक करण्यात आले. नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. लोक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडू नये यासाठी ऑनलाईन वस्तू मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने पुरवण्याची सुविधा करण्यात आली. काही स्वयंसेवक यासाठी कामाला लावण्यात आले. कोरोना महामारी उद्रेकाच्या काळात आरोग्य यंत्रणेची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. कमी दिवसामध्ये हजारो बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली. मेडिकल साहित्याचं उत्पादन वाढवण्यात आलं. 

मार्चमहिन्याच्या पीकनंतर चीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी होत गेली. चीनने कडक अंमलबजावणीच्या जोरावर covid-19 ला आटोक्यात आणले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. मात्र, कोरोनाचा उगम झाला तेव्हा माहिती लपवल्याचा आरोप चीनवर होत आहे. तसेच कोरोना बाधित आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चीन लपवत असल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक देशांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com