पाक हवाई दलाच्या संग्रहालयात अभिनंदन यांचा पुतळा!

IAF-Abhinandan-Varthaman
IAF-Abhinandan-Varthaman

पाकिस्तान वायू सेनेच्या (पीएएफ) युद्ध संग्रहालयात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, या गोष्टीवर ऐकायला गंमतीशीर वाटते. यावर तुमचा विश्वास बसत नसला तरी ही गोष्ट खरी आहे. 

पाकिस्तानमधील राजकीय टीकाकार आणि पत्रकार अन्वर लोधी यांनी यासंबंधीचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या संग्रहालयात अभिनंदनचा पुतळा आणि त्या शेजारी कप ठेवण्यात आला आहे. अन्वर यांनी त्याला मजेशीर असे कॅप्शनही दिले आहे, ''कप अभिनंदन यांच्या हातात ठेवण्याची व्यवस्था करावी.''

फेब्रुवारी महिन्यात भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. यावेळी अभिनंदन यांनी मिग 21 बायसनच्या साहाय्याने पाकिस्तानचे एफ-16 हे लढाऊ विमान पाडले होते. या वेळी त्यांच्याही विमानाला अपघात झाल्याने ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात सापडले. त्यानंतर त्यांना पीएएफने आपल्या ताब्यात घेतले होते.  

पीएएफने फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये वर्धमानला चहा देण्यात आला होता. तसेच त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, त्याने त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. आणि प्रत्युत्तरात तुम्ही दिलेला चहा मजेदार आहे, धन्यवाद, असे उत्तरही दिले होते. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला  होता. त्यावेळी भारत-पाकिस्तान या दोन देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानी माध्यमांनी अभिनंदन आणि त्याला दिलेला चहाचा कप यावरून भारतीय वायु दलाला (आयएएफ) खूप ट्रोल केले होते. 

त्यानंतर पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेवेळीही पाकिस्तानने अभिनंदन वर्धमानच्या रुपातील एक व्यक्ती जाहिरातीमध्ये दाखविण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com