esakal | Facebook वर इस्लामोफोबिया पोस्टवर बंदी घाला, इम्रान खान यांचे मार्क झुकरबर्गला पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan main.jpg

फेसबुकवर मुसलमानांविरोधात वाढत असलेल्या द्वेषपूर्ण भाषेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Facebook वर इस्लामोफोबिया पोस्टवर बंदी घाला, इम्रान खान यांचे मार्क झुकरबर्गला पत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फेसबुकवर इस्लामप्रति द्वेष पसरवणाऱ्या मजकुरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर इस्लामोफोबिक कंटेटवर बंदी घालावी असे म्हटले आहे. परंतु, फेसबुककडून याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. 

इम्रान खान यांनी म्हटले की, ज्या पद्धतीने फेसबुकने हॉलोकॉस्टवर प्रश्न उपस्थित करणे आणि टीका करण्यावर बंदी घातली होती. अगदी तशीच इस्लामोफोबियाशी निगडीत मजकुरावरही बंदी घातली पाहिजे. पाकिस्तान सरकार आणि इम्रान खान यांनी टि्वटरवर हे पत्र शेअर केले आहे. 

हेही वाचा- कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षांचा कारावास

पत्रात इम्रान खान यांनी म्हटले की, मला तुमचे लक्ष जगभरात वाढत असलेल्या इस्लामोफोबियाच्या प्रकरणांकडे वेधायचे आहे. सोशल मीडियावर आणि विशेषतः फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात इस्लामप्रती द्वेष वाढत आहे.

आपल्या पत्रात इम्रान खान यांनी ज्यूंविरोधात हिटलरच्या हॉलोकॉस्टचा उल्लेख करताना या प्रकरणाशी निगडीत मजकुरावर फेसबुकने टाकलेल्या बंदीचे कौतुक केले. 

हेही वाचा- हा नवा भारत, जेथे संकट दिसेल तेथे पहिला वार करु; अजित डोवालांचा इशारा

फेसबुकवर मुसलमानांविरोधात वाढत असलेल्या द्वेषपूर्ण भाषेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तत्पूर्वी इम्रान खान यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनूएल मॅक्रॉन यांच्यावर हल्लाबोल केला होता. मॅक्रॉन यांनी इस्लामवर टीका केली होती आणि मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्यांचा बचाव केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा इम्रान खान यांनी समाचार घेतला होता. 

हेही वाचा- J&K:तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणारे भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

त्यांनी इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देण्याचा मार्ग अवलंबला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच त्यांनी दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी इस्लामवर केला आहे, अशी टीका त्यांनी केली. 

loading image