US Election 2024: भारत अमेरिकेला दुर्बल समजत आहे; अध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली असं का म्हणाल्या?

Republican presidential candidate Nikki Haley : अमेरिकेत अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होत आहेत. त्याआधी डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पक्षांमध्ये प्रायमरी निवडणुका सुरु आहेत.
Republican presidential candidate Nikki Haley
Republican presidential candidate Nikki HaleySakal

वॉशिंग्टन- अमेरिकेत अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होत आहेत. त्याआधी डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पक्षांमध्ये प्रायमरी निवडणुका सुरु आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या भारतीय वंशाच्या उमेदवार निक्की हेली यांनी भारताबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारत अमेरिकेवर विश्वास ठेवत नाही. तो अमेरिकेला कमकूवत समजतो, असं त्या म्हणाल्या आहेत.

निक्की हेली म्हणाल्या की, भारत हा आता हुशार होत आहे. त्याला अमेरिकेच्या नेतृत्त्वावर विश्वास राहिला नाही. त्यामुळेच भारत रशियासोबत संबंध अधिक चांगले करत आहे. भारताला अमेरिकेचा साथीदार बनायचं आहे, पण अमेरिका कितपत नेतृत्व करेल याबाबत त्यांना शंका वाटत आहे. फॉक्स बिजनेस न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत हेली बोलत होत्या. (India consider America as weak Why did us Republican presidential candidate Nikki Haley say that )

Republican presidential candidate Nikki Haley
Use of Children in Election: लहान मुलं निवडणूक प्रचार करताना दिसल्यास उमेदवारावर कारवाई होणार; निवडणूक आयोगाची नवी नियमावली

मी भारतासोबतही डील केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला आहे. मोदी सरकार भागीदार देश बनण्यास इच्छुक आहे. त्यांना रशियासोबत जायचं नाही. पण, भारताला अमेरिकेच्या विजयावर शंका आहे. त्यांना वाटत नाही की आता अमेरिका नेतृत्व करु शकेल. त्यांना वाटतंय की आपण आता कमजोर झालो आहोत. भारताने याबाबत कायम हुशारी दाखवली आहे. त्यामुळे ते रशियाच्या जवळ गेलेत. कारण, तेथूनच त्यांना मोठ्या प्रमाणात लष्करी सामुग्री मिळते, असं त्या म्हणाल्या.

जेव्हापासूनन आपण पुन्हा नेतृत्व सुरु करु, तेव्हा आपण आपला कमकूवतपणा दूर करु. तेव्हाच आपले दोस्त भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्राईल, जपान आणि दक्षिण कोरिया आपल्यासोबत ठामपणे राहतील. जापान आत्मनिर्भर होत आहे. तसंच भारत देखील चीनवरील अवलंबित्व कमी करुन आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने भारतासोबत अधिक चांगले संबंध निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं हेली म्हणाल्या.

Republican presidential candidate Nikki Haley
US Primary Election: जो बायडेन यांची विजयी सुरुवात; दक्षिण कॅरोलिनात मिळवला सहज विजय

संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत आणि साऊथ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निकी हेली (वय५२) या रिपल्बिकन पक्षाकडून अध्यक्षपदाच्या एक उमेदावर आहेत. त्यांच्यासमोर माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ९ (वय ७७) यांचे कडवे आव्हान आहे. डेमोक्रेटिक पक्षाकडून जो बायडेन (वय ८१) हे एकमेव प्रबळ उमेदवार आहेत. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com