

India’s representative addressing the United Nations, strongly condemning Pakistan over cross-border terrorism and civilian attacks.
esakal
भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानला प्रभावीपणे गप्प केले. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानवर तोफ डागत त्यांनी ठामपणे सांगितले की, ज्या देशाचा इतिहास नरसंहार आणि हिंसाचाराने भरलेला आहे, त्या देशाला भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. शिवाय, भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये सीमापार दहशतवादाबाबत एक कडक संदेशही दिला. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांना जबाबदार धरले जावे, अशी मागणी पी. हरीश यांनी केली.