esakal | दिल्ली हिंसाचाराला पाकिस्तानातून फंडिंग? गुप्तचर विभागाला सापडले रेकॉर्डिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi_Violence

- हाच फॉर्म्युला २००२ वेळच्या गुजरात दंगलीवेळीही वापरण्यात आला होता.

दिल्ली हिंसाचाराला पाकिस्तानातून फंडिंग? गुप्तचर विभागाला सापडले रेकॉर्डिंग

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जिनिव्हा : काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्ली येथे सीएए विरोधात आंदोलन सुरू होते. मात्र, या आंदोलनाला गालबोट लागल्याने उसळलेल्या हिंसाचारात दिल्लीत झालेली जीवित आणि वित्त हानी जगाने पाहिली. मात्र, या पूर्ण घटनेचा रिमोट कंट्रोल हा पाकिस्तानमध्ये असल्याचे पुरावे सरकारच्या हाती लागल्याची बातमी पुढे येत आहे.

दिल्ली येथील हिंसाचार आणि २००२ मधील गुजरातमध्ये उसळलेली दंगल याचा एकमेकांशी संबंध आहे. आणि दिल्ली हिंसाचार घडवून आणण्यासाठी पाकने फंडिंग केले असल्याचे पुरावे भारताने जिनिव्हा येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत सादर केले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय गुप्तचर विभागाने दोन्ही देशांच्या सीमांदरम्यान होत असलेल्या संवादांची देवाण-घेवाण ऐकली आहे. यानुसार, पाकमधील देशविघातक प्रवृत्तींनी सीएए विरोधात पैसे देऊन सीएएला विरोध करण्यासाठी लोक जमा केले होते. एका कॉलमध्ये हँडलर लोकांची संख्या आणखी वाढविण्यासाठी खूप आग्रही असल्याचे त्याच्या बोलण्यावरून समजले. मात्र, हा संवाद कधी झाला आणि कुणादरम्यान झाला याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही, असे 'हिंदुस्तान टाईम्स'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.  

- कोरोना पासून बचावासाठी मास्क खरेदी करताय ? तर ही बातमी वाचाच...

काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, दिल्ली हिंसाचारामध्ये मानवी आणि वित्त हानी करण्यावर जाणीवपूर्वक लक्ष्य देण्यात आले होते. उत्तर भारतातील हजारो कट्टर मुस्लीम तरुणांच्या गटात पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा, यासाठी भडकावू भाषणांच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स व्हायरल करण्यात आल्या होत्या. तसेच इराण आणि तुर्की या देशांमध्ये शिया आणि सुन्नी या इस्लाममधील दोन गटांमध्ये वर्चस्वावरून वारंवार खटके उडत असतात. हाच फॉर्म्युला २००२ वेळच्या गुजरात दंगलीवेळीही वापरण्यात आला होता.

- अनुपम खेर यांची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी; नाटकानं आणलं जवळ

एनडीए सरकारने मुस्लीमांचा छळ करत अनेकांची हत्या केली, असे आरोप पाकने संयुक्त राष्ट्र संघासमोर भारताची बदनामी करण्यासाठी केले. मात्र, इम्रान खान सरकार हे आपल्या आरोपात सीएए हे शब्द कधीच वापरत नाही. उलट हा कायदा पाकिस्तानमधील इतर अल्पसंख्यांकाच्या हितासाठी तयार करण्यात आला आहे, असे वारंवार म्हटल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. 

- येस बँकमुळं 'फोन पे'ऍपला फटका; ऍपची बँक बदलली जाणार?

जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांची मानवाधिकार परिषद भरविण्यात आली आहे. या परिषदेत भारताला खाली खेचण्याची एकही संधी पाक सोडताना दिसत नाही. भारतात धार्मिक आणि जातीयवादाला महत्त्व दिले जात असून त्यांना रोखले गेले पाहिजे, असा इशारा पाक प्रतिनिधीने यावेळी दिला. तसेच दिल्लीतील हिंसाचार रोखत दिल्लीतीलच नव्हे, तर पूर्ण भारतातील मुस्लिमांच्या सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेतली जावी, याकडे भारतीय उच्चायुक्तांनी लक्ष्य द्यावे, अशी सूचना पाक प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या या परिषदेमध्ये केली.