esakal | वर्णभेदाला वैतागून भारतीय वंशाच्या ब्रिटिश नेत्याने घेतला टोकाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

meghnad desai

भारतातील अनेक घडामोडींवर ते अचूक भाष्य करतात. भारतीय राजकारणावरही त्यांचं बारीक लक्ष असतं.

वर्णभेदाला वैतागून भारतीय वंशाच्या ब्रिटिश नेत्याने घेतला टोकाचा निर्णय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लंडन : भारतीय वंशाचे अर्थशास्त्री, लेखक लॉर्ड मेघनाद देसाई यांनी ब्रिटनच्या विरोधी पक्षातून आता राजीनामा दिला आहे. ते लेबर पार्टीचे सदस्य होते. भारतातील अनेक घडामोडींवर ते अचूक भाष्य करतात. भारतीय राजकारणावरही त्यांचं बारीक लक्ष असतं.

मात्र, आता त्यांनी लेबर पार्टीला वंश भेदभावावर परिणामकारकपणे उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी असं म्हटलंय की, ते नेहमीच लेबर पार्टीचे समर्थक होते. पण सदस्यता घेतल्यानंतर तब्बल 49 वर्षांनंतर गुरुवारी त्यांनी पक्ष सोडला आहे. जेमी कॉर्बिन यांना फक्त 19 दिवसांच्या निलंबनानंतर पक्षात  पुन्हा एकदा सामिल केलं गेलं. त्यांच्यावर देशातील मानवाधिकार निरीक्षकांकडून 'बेकायदेशीर कृत्यां'मध्ये सामील असल्याचा ठपका ठेवला होता.  

हेही वाचा - अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या माला अडिगांची 'बायडेन टीम'मध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

लॉर्ड देसाई यांनी म्हटलं की, त्यांना माफीशिवाय परतण्याची परवानगी देण्याचा निर्णय चुकीचा होता. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पार्टी व्हीपसाठी काही महिन्यांपर्यंत त्यांना अदखल केलं गेलं. मात्र खूप मोठ्या संकटावर ही खुपच साधारण प्रतिक्रीया होती. त्यांनी म्हटलं की, मी खूप निराश आहे की पक्षात वंशवाद आहे. ज्यू खासदारांना उघडपणे बरं-वाईट बोललं जातं. महिला सदस्यांना ट्रोल केलं जातं. हे स्पष्ट आहे आणि स्पष्टरुपाने हा वंशवाद आहे.

हेही वाचा - सत्ता हाती घेताच चीनला नियम पाळायला लावू; बायडेन ट्रम्प यांचाही निर्णय बदलणार
लेबर पार्टीवर काही वर्षांपासून ज्यूंबाबत वंशवादाचा आरोप लावला जातोय. तसेच 2019 च्या निवडणुकीतील पराभवाला देखील हेच कारण मानलं जात आहे. देसाई यांनी म्हटलं की, मी ज्यू लोकांना पूर्वग्रहदुषित दृष्टीकोनातून पाहणाऱ्या पक्षात राहू शकत नाही. त्यांनी ही गोष्टदेखील ठामपणाने स्पष्ट केली की इतर कोणत्याही पक्षात सामिल व्हायचा त्यांचा हेतू नाहीये.

loading image
go to top