
कोरोनावरील लशीची परिणामकारकता पडताळण्यासाठी ॲस्ट्राझेनेका कंपनी जागतिक पातळीवर अतिरिक्त चाचण्या करण्याची शक्यता आहे. यामुळे नियामकांकडून मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता मुख्य कार्यवाह पास्कल सोरीओत यांनी फेटाळून लावली.
लंडन - कोरोनावरील लशीची परिणामकारकता पडताळण्यासाठी ॲस्ट्राझेनेका कंपनी जागतिक पातळीवर अतिरिक्त चाचण्या करण्याची शक्यता आहे. यामुळे नियामकांकडून मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता मुख्य कार्यवाह पास्कल सोरीओत यांनी फेटाळून लावली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ॲस्ट्राझेनेकाकडून दोन पद्धतीच्या चाचण्या झाल्या. पहिला डोस अर्धा व दुसरा पूर्ण आणि दोन पूर्ण डोस अशा पद्धती होत्या. यातील कमी डोसच्या म्हणजे एक अर्धा आणि एक पूर्ण अशा पद्धतीत ९० टक्के परिणामकारकता आढळून आली. दुसऱ्या पद्धतीत मात्र केवळ ६२ टक्के परिणामकारकता आढळली. यावरून अंतिम टप्प्यातील चाचण्यांच्या अभ्यासातील निष्कर्षांवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशावेळी कमी डोसच्या पद्धतीमधील परिणामकारकता पडताळण्यासाठी अतिरिक्त चाचण्या होतील.
भारतात तयार होणार रशियाच्या लशीचे 10 कोटी डोस
सोरीओत यांनी ब्लूमबर्ग न्यूजला सांगितले की, अमेरिकेत सध्या नियमन प्रक्रिया सुरू आहे. त्यात चाचणीचा समावेश करण्याऐवजी कमी डोसच्या परीक्षणासाठी नव्याने अभ्यास सुरू केला जाईल. आम्हाला त्यात जास्त परिणामकारकता आढळून आली असल्यामुळे ही पद्धत आम्हाला प्रमाणित करावी लागेल.
दोन पद्धतींच्या परिणामकारकतेमधील तफावत पाहता अनेक संशोधकांनी निकालांच्या भक्कमपणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यातच एका पद्धतीमधील अर्धा डोस चुकून दिला गेल्याचे नंतर लक्षात झाले. या लशीला अमेरिका आणि युरोपीय महासंघाच्या नियमन संस्थांकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे. ती वेगाने मिळवण्यात अतिरिक्त चाचण्यांमुळे अडथळे येतील असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. सोरीओत यांनी मात्र ती शक्यता फेटाळून लावली. एक अर्धा-दुसरा पूर्ण अशा पद्धतीची आणखी छाननी सुरू ठेवण्यास भक्कम आधार आहे. त्यातून मिळणारी नवी आकडेवारी आधीच्या आकडेवारीमध्ये, जी नियामकांना सादर केली जाणार आहे, त्यात समाविष्ट केली जाईल.
देशाला कोरोनाचा दणका तरीही राष्ट्राध्यक्ष म्हणतात लस टोचून घेणार नाही
परिणामकारकता जास्त असल्याचे यापूर्वीच आढळून आल्यामुळे सहभागी स्वयंसेवकांची संख्या कमी असेल, असे सोरीओत यांनी सांगितले.
तुमच्या डोससह आमचाही द्या - रशिया
मॉस्को - स्पुटनिक ५ ही लस निर्माण केलेल्या आणि जगात सर्वप्रथम नोंदणी केलेल्या रशियाच्या गामालेया संशोधन संस्थेने ॲस्ट्राझेनेकाला युतीचे आमंत्रण दिले. तुमची लस परिणामकारक ठरावी म्हणून तुमच्या डोसच्या जोडीला आमचाही डोस द्यावा, असे ट्विटरच्या माध्यमातून सांगण्यात आले.
ॲस्ट्राझेनेकाची सध्याची दोन पूर्ण डोसची पद्धत ६२ टक्के परिणामकारकता दर्शविते. त्यांनी प्रयोगशाळेत नव्या चाचण्या घ्यायचे ठरविले तर त्यांच्या डोसच्या जोडीला आमचा डोस द्या. दोन लशी एकत्र करणे फेरलसीकरणासाठी महत्त्वाचे ठरू शकेल, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
INDvAUS : अदानींना कर्ज देऊ नका; मॅचदरम्यान मैदानात येऊन तरुणाची बॅनरबाजी
ॲस्ट्राझेनेकाच्या लशीचे मूल्यांकन होणार
लंडन - कोरोना विषाणूवर ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे विकसीत होत असलेल्या लशीचे मूल्यांकन करून तीन लस मान्यता देण्यायोग्य आहे की नाही, याचा निर्णय घेण्याची सूचना ब्रिटन सरकारने त्यांच्या औषध आणि आरोग्य नियामक मंडळाला केली आहे. ॲस्ट्राझेनेकाच्या लशीच्या चाचणण्यांबाबतचे निश्चित आकडेवारी जाहीर न केल्याने आणि डोस पुरेशा प्रमाणात दिला न गेल्याने साशंकता निर्माण झाली आहे.
Edited By - Prashant Patil