आधीच कोरोनाच्या संसर्गाने थैमान आणि आता त्यात आंदोलनाचा भडका

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जून 2020

मास्कपासून सुरक्षा नाही 
अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. अनेक आंदोलकांनी  निदर्शनादरम्यान मास्क घातले असले तरी त्यांना संसर्ग होणारच नाही याची हमी देता येणे शक्य नसल्याचे म्हटले  आहे. युरोपात पॅरिसमध्ये देखील विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आंदोलनावर बंदी घालण्यात आली आहे. जमावबंदी लागू झाल्यानंतर देखील या भागात आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या काही आंदोलकांची मध्यंतरी धरपकड करण्यात आली होती.

सरकारसमोर दुहेरी संकट; पॅरिस, हाँगकाँगमध्येही खदखद
न्यूयॉर्क - अमेरिकेत आधीच कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असताना आता त्यात हा आंदोलनाचा भडका उडाल्याने विषाणू संसर्ग अधिक पसरण्याची भीती  व्यक्त केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, लंडनमधील ट्रॅफलगार चौक, पॅरिस, हाँगकाँग अशा शहरांमध्येही याप्रकरणी निदर्शने झाली. अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन फलक झळकाविले. त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती जागतिक बनत असल्याचे दिसते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अटलांटाच्या महापौरांनी तर  तुम्ही काल रात्री आंदोलनासाठी बाहेर पडला असाल तर आज कोरोनाची चाचणी करून घ्यायला हवी असे म्हटले आहे. मध्यंतरी अमेरिकी सरकारने अर्थचक्र गतिमान करण्यासाठी निर्बंध मागे  घेतले होते. यानंतर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मोदी म्हणाले, ''सोबत बसून समोसा खाऊ!''

हॉंगकाँगमध्येही चिनी दडपशाहीच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्याने येथेही कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्याची भीती व्यक्त होते आहे. पॅरिसमध्ये काहीशी अशीच स्थिती आहे. चीन सरकार सोशल डिस्टंसिन्गचा मुद्दा पुढे करत आमचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हाँगकाँगमधील आंदोलकांनी केला आहे.

चीनच्या कुरापतीदरम्यान 'बलशाही भारत'चे दर्शन!, ही आहे भारताची ताकद

आंदोलक सुरक्षित अंतर पाळत नाहीत.  भावनेच्या भरात आपण अप्रत्यक्षपणे विषाणूंचा फैलाव करत असतो याचे भान ठेवणे गरजेचे असल्याचा इशारा वैद्यकीय चिकित्सकांनी दिला आहे.  जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर अनेक आंदोलक हे उत्स्फुर्तपणे रस्त्यांवर उतरले. बाहेरची स्थितीच अशी होती की घरी बसणे शक्यच नव्हते असे एका महिला आंदोलकाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infection due to agitation Coronavirus