Israel Hamas war Updates: पवित्र रमजानच्या पहिल्या दिवशीच गाझामध्ये क्षेपणास्त्र हल्ला; हिजबुल्लाने डागले शेकडो रॉकेट, 70हून अधिक ठार

Israel Hamas war Updates:आयडीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, हिजबुल्लाच्या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या युद्धविमानांनी सकाळी क्षेपणास्त्र फायर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रक्षेपकांवर हल्ला केला.
Israel Hamas war Updates
Israel Hamas war UpdatesEsakal

Israel Hamas war Updates: इस्त्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच लेबनॉनवर इस्राइलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) सकाळी उत्तर इस्राइलच्या दिशेने जवळपास 100 रॉकेट डागले. इस्रायली सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

इस्राइल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या म्हणण्यानुसार, लेबनीज हिजबुल्लाह अतिरेक्यांनी अप्पर गॅलीली प्रदेश आणि इस्राइलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्सवर क्षेपणास्त्र डागले आहेत. देशाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने काही क्षेपणास्त्र हवेतच पाडले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची तात्काळ माहिती मिळालेली नाही.

Israel Hamas war Updates
Ajit Doval in Israel : अजित डोवाल इस्राइलमध्ये; युद्धाच्या पार्श्वभूमीवर घेतली पीएम नेतन्याहू यांची भेट; काय आहे कारण?

आयडीएफने एका निवेदनात पुष्टी केली की, हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या युद्धविमानांनी सकाळी क्षेपणास्त्र फायर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रक्षेपकांवर हल्ला केला.

लेबनीज राजधानी बेरूतपासून सुमारे 45 किमी पूर्वेला असलेल्या बेका खोऱ्यात इस्रायली हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाने हे हल्ले केले. इस्राइलच्या सीमेपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेली बेका व्हॅली हिजबुल्लाचा गड मानली जाते.

Israel Hamas war Updates
Indian Woman Murdered in Australia: ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय महिलेची हत्या; कचराकुंडीत आढळला मृतदेह, घटनेने खळबळ

आयडीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, गोलन हाइट्सच्या दिशेने हिजबुल्लाने केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून दहशतवादी संघटनेच्या हवाई दलाशी संबंधित दोन ठिकाणांना लक्ष्य केले गेले.

रमजानच्या पहिल्या दिवशी गाझामध्ये 70 लोक मारले गेले

रमजानच्या पहिल्या दिवशी रविवारी गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 70 जण ठार झाले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे. इस्राइलच्या हल्ल्यात आतापर्यंत 31,112 लोक मारले गेले आहेत.

Israel Hamas war Updates
PM Modi : पुतिन करणार होते युक्रेनवर अणुबॉम्ब हल्ला, पण मोदींच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला; US रिपोर्टमध्ये दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com