Air strike : इस्राईलने चार महिन्यांनंतर लेबनॉनच्या बैरूतवर जोरदार हल्ला केला. हिज्बुल्लाच्या ड्रोन साठवणुकीच्या ठिकाणाला लक्ष्य केले असून या भागात मोठा स्फोट झाला.
बैरूत : इस्राईलने चार महिन्यांनंतर प्रथमच लेबनॉनची राजधानी बैरूतवर हल्ला केला. इस्राईल आणि हिज्बुल्ला यांच्यात नोव्हेंबरमध्ये संघर्ष थांबल्यानंतर हा पहिलाच मोठा हल्ला आहे.