
कर्मचाऱ्यांसाठी 'ही' कंपनी शोधतेय वधू-वर, लग्न केल्यास देते पगारवाढ
कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी अनेक योजना राबवित असते.अशातच मदुराईस्थित एका आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखी योजना राबविली आहे. ही कंपनी चक्क वधू-वर शोधत आहे आणि एवढंच काय तर लग्न झाल्यावर त्यांना खास गिफ्ट देत आहे. या कंपनीने त्यांनी शोधून दिलेल्या वधू वरासोबत लग्न केल्यास पगार वाढवण्याची ऑफर दिली आहे. (IT Company Gives A Special Raise If Their Employees Get Married with match-making services followed.)
हेही वाचा: एकाच कंपनीत चक्क 84 वर्षे नोकरी; गिनीज बुकात नोंद
अनेक भारतीय आयटी कंपन्या उच्च एट्रिशन दराशी झुंजत असताना या क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही मध्यम-स्तरीय कंपन्यांनी प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी कोड क्रॅक केला आहे. मदुराईस्थित एका आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत मॅच मेकिंग सेवा आणि लग्न केल्यास पगार वाढवण्याची ऑफर दिली आहे. श्री मूकाम्बिका इंफोसोल्यूशंस असे कंपनीचे नाव आहे.
तेव्हापासून श्री मूकाम्बिका इंफोसोल्यूशंस (एसएमआई) Sri Mookambika Infosolutions (SMI) कंपनीत नोकरी गमावण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. कंपनीने अनेक वर्षांपासून 10 टक्के एट्रिशन रेट नोंदवला आहे. इन्फोसिस आणि विप्रो सारख्या कंपन्यांच्या तुलनेत हे कमी आहे.
हेही वाचा: WhatsApp यूजर्ससाठी आजपासून नवीन फीचर; Mark Zuckerberg म्हणाले..
आज, SMI 750 हून अधिक लोकांना रोजगार देते, त्यापैकी सुमारे 40 टक्के किमान 5 वर्षांपासून कंपनीत आहेत. ही कंपनी 2006 मध्ये शिवकाशी, तमिळनाडू येथे सुरू झाली. हळूहळू, त्याचा विस्तार होऊ लागला, परंतु योग्य लोकांना कामावर घेणे हे एक मोठं आव्हान होतं म्हणून व्यवस्थापनाने 2010 मध्ये मदुराई येथे आपली कंपनी हलवली. अगदी सुरुवातवातीपासूनच,SIMने आपल्या कर्मचाऱ्यांना ही खास ऑफर दिली आहे.
Web Title: It Company Gives A Special Raise If Their Employees Get Married With Match Making Services Followed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..