अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या पहिल्या पत्नीचे निधन| Ivana Trump first wife | former US president Donald Trump | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ivana Trump first wife of former US president Donald Trump

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या पहिल्या पत्नीचे निधन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्क शहरात निधन झालं. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली.(Ivana Trump first wife of former US president Donald Trump)

वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इव्हाना ट्रम्प यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे कारण कुटुंबीयांकडून स्पष्ट झालेल नाही.

हेही वाचा: एअर इंडिया बॉम्बस्फोट प्रकरणातील रिपुदमन सिंह मलिक यांची कॅनडात गोळ्या झाडून हत्या

इव्हाना यांचे न्यूयॉर्क शहराच्या अप्पर ईस्ट बाजूला त्यांच्या घरी निधन झाले. अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तसेच, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गुरुवारी दुपारी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवर माजी पत्नीच्या मृत्यूची बातमी शेअर केली होती.

आईच्या निधनावर मुलगी इवांका ट्रम्पने भावनिक पोस्ट लिहिली आणि म्हणाली, आईच्या निधनाने माझे मन दु:खी झाले आहे. आई हुशार, मोहक, तापट आणि विनोदी होती. तिनं आयुष्य भरभरून जगले - हसण्याची आणि नाचण्याची संधी कधीही सोडली नाही. मी तिची नेहमी आठवण ठेवीन आणि तिची आठवण माझ्या हृदयात कायम ठेवेन.

इव्हाना ट्रम्प या डोनाल्ड जूनियर, इवांका आणि एरिक ट्रम्प यांची आई आहे. आईच्या निधनावर एरिक ट्रम्प म्हणाले, आमची आई एक अतुलनीय महिला होती. व्यवसायात त्यांची एक वेगळीच ओळख होती. एक जागतिक दर्जाची खेळाडू, एक सुंदर स्त्री आणि काळजी घेणारी आई आणि मैत्रीणीचं आज निधन झालं.

हेही वाचा: SriLanka: राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर लंकेतील जनतेचा जल्लोष

डोनाल्ड ट्रम्प आणि इव्हाना ट्रम्प, 80 च्या दशकात न्यूयॉर्क शहरातील सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 1993 मध्ये अभिनेत्री मार्ला मॅपल्सशी लग्न केलं. पण मॅपल्स यांच्यासोबतचं ट्रम्प यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि 1999 मध्ये त्यांनी मारला मॅपल्स यांना घटस्फोट दिला, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 2005 मध्ये मेलानिया ट्रम्प यांच्याशी लग्न केलं.

Web Title: Ivana Trump First Wife Of Former Us President Donald Trump

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..