esakal | अंबानी नव्हे, 'हा' आहे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

jack ma crossed mukesh ambani becomes richest person asia

जॅक मा यांची संपत्ती अंबानी यांची संपत्ती यात एक हजार 800 कोटी रुपयांचा फरक आङे.

अंबानी नव्हे, 'हा' आहे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : कोरोना आणि तेलाच्या घसरलेल्या किमतींचा फटका औद्योगिक क्षेत्रातला बसला असून, रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांना मोठा फटका बसला आहे. कालच्या शेअर बाजारातील मोठ्या घसरणीनंतर अंबानींच्या संपत्तीत जवळपास 44 हजार कोटी रूपयांची घसरण झाली. त्यामुळं मुकेश अंबानींनी आशियातील श्रीमंत व्यक्तीचा 'टॅग' गमावला असून, आता चीनचे ख्यातनाम उद्योगपती जॅक मा आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तेलाचा किमतींमध्ये घसरण झाल्यानंतर रिलायन्स उद्योग समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले. केवळ रिलायन्सच नव्हे तर, पेट्रो केमिकल उद्योगाशी संबंधित सर्वच कंपन्यांना फटका बसला. त्यात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट होऊन ती, 2 लाख 93 हजार कोटी रुपये झाली. तुलनेत अलिबाबा ग्रुपचे प्रमुख जॅक मा यांच्या संपत्तीत कोणतिही घट झाली नाही. सध्या जॅक मा यांची सपत्ती 3 लाख 11 हजार कोटी आहे. म्हणजे जॅक मा यांची संपत्ती अंबानी यांची संपत्ती यात एक हजार 800 कोटी रुपयांचा फरक आङे. त्यामुळं आता जॅक मा आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती झाले आहेत. 

आणखी वाचा - अंबानी यांनी गमावला आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा टॅग 

का घसरल्या तेलाच्या किमती?
सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यातील मतभेदांमुळं सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती एक-दोन नव्हे, तर 30 टक्क्यांनी घसरल्या. आशाती युद्धानंतर 1991नंतर पहिल्यांदा एका दिवसात तेलाच्या किमती इतक्या मोठ्या प्रमाणावर खाली आल्या आहेत. त्यामुळं भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. रिलायन्स उद्योग समूहाचे शेअर्स 12 टक्क्यांनी घसरले. 2009च्या जागतिक मंदीतील घसरणीनंतर पहिल्यांदाच  रिलायन्सच्या शेअर्सना इतका मोठा फटका बसला आहे. 

आणखी वाचा - ज्योतिरादित्य शिंदे यांची बंडखोरी की, काँग्रेसचं अपयश?

कोण आहेत जॅक मा?
जॅक मा हे चीनमधील अलिबाबा ग्रुपचे संस्थापक आहेत. जगातील सर्वांत शक्तीशाली व्यक्तींमध्ये जॅक मा यांचा उल्लेख केला जातो. चीनच्या औद्योगिक क्षेत्राचे ते ग्लोबल ऍम्बॅसेडर आहेत. Alibaba.com तसेच Aliexpress यांसारख्या ई कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून जॅक मा यांनी जगभरातील बाजारपेठ काबीज केली आहे. जॅक मा यांचा प्रवास अतिशय विलक्षण आहे. एकेकाळी इंग्रजी बोलता यावं यासाठी चीनमध्ये पर्यटकांसाठी गाईड म्हणून काम करणाऱ्या जॅक मा यांनी चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवलाय. 
 

loading image