जपानी स्टार्टअपने बनविला ‘सी-मास्क’

यूएनआय
Monday, 29 June 2020

रोबो तयार करण्यासाठी आम्ही अनेक वर्षे कसून प्रयत्न केले. हे तंत्रज्ञान वापरून आम्ही असे उत्पादन तयार केले आहे जे कोरोनामुळे समाज कसा बदलतो आहे, त्यानुसार प्रतिसाद देते.
- ताइसुके ओनो, मुख्य कार्यवाह

टोकियो - ‘डोनट रोबोटिक्‍स’ या जपानमधील स्टार्टअप कंपनीने ‘सी-मास्क’ तयार केला आहे, जो मोबाईलमधील ॲपशी जोडता येतो. इंटरनेटमुळे या मास्कमुळे जपानी संदेशांचा इतर आठ भाषांत अनुवाद करता येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संकट-संघर्ष-संकल्पना

 • कोरोनाची साथ जगात पसरत असतानाच कंपनीचा टोकियोमधील हानेदा विमानतळाशी करार
 • यानुसार रोबो गाईड आणि अनुवादक पुरविण्याचे कंत्राट मिळाले
 • त्याचवेळी हवाई प्रवास ठप्प झाल्याने कंपनीचे भवितव्य अधांतरी
 • कंपनीला उपयोग होईल असे उत्पादन बनविण्यासाठी इंजिनियर्सची संकल्पना
 • चीन, अमेरिका, युरोपमध्येही विक्रीसाठी प्रयत्न करणार
 • अशा ठिकाणी ‘सी-मास्क’च्या वापरासाठी ग्राहक उत्सुक

‘जी७’ समूहात या देशाचा समावेश करण्यास जपानने दर्शविला विरोध

सप्टेंबरपासून विक्री
सप्टेंबरपासून जपानमधील खरेदीदारांना मास्क विक्री सुरू होणार असून पहिल्या ‘बॅच’मध्ये पाच हजार ‘सी-मास्क’ असतील. प्रत्येकी ४० डॉलरला विक्री होईल. काही महिन्यांपूर्वी जी बाजारपेठच मुळी अस्तित्वात नव्हती त्यावर आता कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. युजर्सना डाऊनलोड कराव्या लागणाऱ्या ॲपसाठी सर्व्हिस देऊन त्यांना उत्पन्न मिळविण्याची अपेक्षा आहे.

समलिंगी कामगारांना न्यायालयाचे संरक्षण

विद्यार्थ्याच्या प्रोजेक्‍टचे मूळ
या कंपनीतील शुनसुके फुजीबायाशी नावाच्या इंजिनियरने चार वर्षांपूर्वी विद्यार्थी असताना एक प्रोजेक्‍ट केला होता. चेहऱ्यावरील स्नायूंचे ‘मॅपिंग’ करून इंटरनेट स्पीचची मांडणी असा हा प्रोजेक्‍ट होता. मास्कचे डिझाईन त्यावरून करण्यात आले, तर रोबोकडून अनुवादासाठीची संगणकप्रणाली एका महिन्यात तयार करण्यात आली. त्यानुसार ‘सी-मास्क’ची प्रतिकृती (प्रोटोटाइप) तयार करण्यात आली.

पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सेजवर दहशतवादी हल्ला

असा होतो वापर

 • ‘सी-मास्क’ प्लॅस्टिकचा असून रंग पांढर
 • चेहऱ्यावरील नेहमीच्या मास्कवर तो लावायचा
 • स्मार्टफोनचा ब्लुटूथ टॅबला कनेक्‍ट करायचा
 • त्यातून संभाषणाचे लिखित मजकुरात रुपांतर होते
 • त्याचा अनुवाद करणे शक्‍य
 • फोन करणे, मास्क घातलेल्या व्यक्तीचा आवाज वाढविणे शक्‍य

तीन मिनिटांत सात दशलक्ष येन

 • डोनट रोबोटीक्‍सचे रोखे विक्री करून निधीउभारणी
 • फंडिन्नो या जपानमधील क्राउडफंडिंग साईटच्या माध्यमातून विक्री
 • पहिल्या तीन मिनिटांत सात दशलक्ष येन इतका निधी
 • २७ मिनिटांत २८ दशलक्ष येन आकडा गाठल्यानंतर विक्री थांबविली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japanese startup makes CMask