कोरोनामुळे जपानच्या सुमो पैलवानाचा मृत्यू

Japans sumo, coronavirus, Covid 19
Japans sumo, coronavirus, Covid 19

टोकियो : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जन-जीवन विस्कळीत झाले आहे. भारतच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात जागतिक महा साथीच्या रोगाची दहशत पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकलेल्या रुग्णांपैकी दिवसागणिक अनेकजण आपला जीव गमावत आहेत. जपानमधील कुस्तीच्या आखाड्यातील सुमो पैलवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जपान सुमो संघ (जेएसए) ने बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 28 वर्षीय पैलवान हैसोबुशी याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे कुस्ती क्षेत्रातील मल्लाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.  क्योडो वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी  सोबुशी याची पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लागण झालेला तो जपानमधील पहिला सुमो पैलवान होता. त्यानंतर 19 एप्रिल रोजी त्याची प्रकृती अधिक खालावली. त्याला टोकियो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच रुग्णालयात बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.   

सोबुशीने 2007 मध्ये कुस्तीच्या आखाड्यात पदार्पण केले होते.  जेएसएच्या चौथ्या डिव्हिजनमध्ये त्याने 11 व्या स्थानावर मजल मारली होती. जपानमध्ये 25 एप्रिल रोजी लोव्हर डिव्हिजनमध्ये चार पैलवानांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. चीनच्या वुहानमधून जगभरात पसरेलल्या कोरोनामुळे खेळाची मैदाने ओस पडली आहे. जगातील मानाची स्पर्धा समजल्या जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा यंदा टोकियोत रंगणार होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली होती. ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी जपानने खूप मोठी खटाटोप केली होती. स्पर्धेसाठी त्यांनी पाण्यासारखा पैसाही ओतला आहे. ऑलिम्पिंक स्पर्धेशिवाय युरोपातील लोकप्रिय फुटबॉल लीग आणि अन्य खेळाला देखील कोरोनाने चांगलाच दणका दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com