अपघात, ड्रग्जची नशा ते मुलाचा मृत्यू; बायडेन यांचं खासगी आयुष्य वेदनांनी वेढलेलं

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 20 January 2021

डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली असून ते आणि त्यांची पत्नी जिल (Jill Biden) व्हाईट हाऊसचे रहिवाशी झाले आहेत.

वॉशिंग्टन- डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली असून ते आणि त्यांची पत्नी जिल (Jill Biden) व्हाईट हाऊसचे रहिवाशी झाले आहेत. आपल्या पूर्ण करिअरदरम्यान बायडेन यांनी आपल्या परिवाराची काळजी घेतली.   

ज्यो बायडेन यांच्या परिवाराची माहिती घेऊया

ज्यो बायडेन यांच्या पत्नी म्हणजे फर्स्ट लेडी जिल शिक्षक आहेत. फर्स्ट लेडी पारंपरिक पद्धतीने केवळ औपचारिक कर्तव्य पूर्ण करतात, पण असं मानलं जातंय की जिल पूर्णकालीन इंग्रजी प्रोफसर म्हणून काम करत राहतील. फर्स्ट लेडी म्हणून जिल शिक्षणासंबंधी मुद्द्यांवर काम करत राहण्याची शक्यता आहे. जिल, माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी 2011 मध्ये सैनिकांच्या परिवारासाठी सुरु केलेल्या एका योजनेवर काम करु शकतात.

परीक्षा न देता IAS झाली लोकसभा अध्यक्षांची मुलगी? वाचा काय आहे सत्य

ज्यो आणि जिल यांची भेट कशी झाली

1975 मध्ये बायडेन यांची जिल यांच्यासोबत भेट झाली होती. याआधी ज्यो बायडेन यांची पहिली पत्नी आणि एका मुलाचा कार दुर्घटनेत मृत्यू धाला होता. पत्नी आणि मुलाच्या निधनामुळे बायडेन यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. जिल त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांनी स्वत:ला कसंबसं सावरलं. त्यांनी जील यांच्यासोबत 1977 मध्ये लग्न केलं. त्यामुळे कार दुर्घटनेत वाचलेल्या हंटर आणि ब्यू या दोन मुलांची जबाबदारी जिलवर आली. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये त्या बायडेन यांच्या प्रमुख प्रचारक होत्या. 

बायडेन यांची मुलं हंटर आणि ब्यू

पहिल्या पत्नीच्या जाण्यानंतर हंटर आणि ब्यू या मुलांची जबाबदारी ज्यो बायडेन यांनी समर्थपणे पेलली. अनेक वर्ष सीनेटर राहिलेले बायडेन, आपली मुलं हंटर आणि ब्यू यांच्यासोबत राहण्यासाठी डेलावेअर आणि वॉशिंग्टनदरम्यान दररोज 2 तासांचा ट्रेनचा प्रवास करायचे. त्यांचा मुलगा ब्यूने इराकमध्ये सैन्यात सेवा बजावली होती आणि डेलावेयरचे अॅटोर्नी जनरल बनले. पण, 2015 मध्ये ब्रेन कँसरने 46 व्या वर्षी ब्यू यांचे निधन झाले. 

बेरोजगारांच्या खिशातून केली पोस्टाने तीस कोटींची कमाई!पदभरतीच्या नावाखाली...

बायडेन आपल्या दिवंगत मुलाचा अनेकदा उल्लेख केला आहे. बायडेन यांचा दुसरा मुलगा हंटर दारु आणि मादक पदार्थ्यांच्या आहारी गेला आहे. 2014 मध्ये त्याला कोकीनचे सेवन केल्याच्या आरोपावरुन नौसेनेतून सुट्टी देण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीदरम्यान हंटरच्या मुद्द्यावरुन बायडेन यांना लक्ष्य केलं होतं. पण, बायडेन यांनी आपल्या मुलाची साथ कधीही सोडली नाही. बायडेन यांना खासगी आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अनेक जवळच्या व्यक्तींना गमवावं लागलं. पण, त्यांनी आज अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jill Joe Biden us america president take outh of post