esakal | हॅलो बायडेन बोलतोय! पत्रकार खाशोगी हत्येप्रकरणी बायडेन यांचा सौदीच्या युवराजांना फोन

बोलून बातमी शोधा

Biden_King_Salman}

युवराज मोहंमद यांनी मात्र खाशोगींच्या हत्येत आपला हात नसल्याचा दावा केला आहे.

हॅलो बायडेन बोलतोय! पत्रकार खाशोगी हत्येप्रकरणी बायडेन यांचा सौदीच्या युवराजांना फोन
sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दैनिकातील स्तंभलेखक आणि पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्याप्रकरणामध्ये पुन्हा एकदा सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांचे नाव चर्चेत आले आहे. खाशोगी यांच्या हत्येला सलमान यांनीच मान्यता दिली होती, असा दावा अमेरिकेच्या एका गोपनीय अहवालात करण्यात आला असून तो अहवाल शनिवारी (ता.२७) प्रसिद्ध होऊ शकतो. 

पॉपस्टार लेडी गागाच्या दोन कुत्र्यांची चोरी; माहिती देणाऱ्याला कोट्यवधींचं बक्षीस​

अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयए आणि अन्य संस्थांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. खाशोगी यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये इस्तंबूल शहरात सौदीच्या दुतावासामध्ये अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल अद्याप प्रसिद्ध झाला नसल्याने त्यामध्ये युवराजांच्या भूमिकेवर कितपत प्रकाश टाकण्यात येईल यावर आताच भाष्य करणे योग्य नसल्याचे एका अमेरिकी अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर स्पष्ट केले.

बायडेन इन ॲक्शन! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच एअर स्ट्राइक; दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त​

बायडेन सलमान यांच्या चर्चा 
राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकांच्या कार्यालयाकडून हा अहवाल तयार करण्यात आला असून यामुळे अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या अहवालाच्या पार्श्वभूमीवर सौदीचे राजे सलमान यांच्या दूरध्वनीवरून संवाद साधल्याचे समजते. 

गरीबीविरोधात चीनचा ऐतिहासिक विजय; 77 कोटी गरीबांना काढलं दारीद्र्यातून बाहेर​

मोहंमद यांनी आरोप फेटाळले 
बायडेन आणि राजे सलमान यांच्यातील चर्चेमध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि येमेनमधील संघर्ष संपवा म्हणून दोन्ही देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा मुद्दाही केंद्रस्थानी होता. दरम्यान युवराज मोहंमद यांनी मात्र खाशोगींच्या हत्येत आपला हात नसल्याचा दावा केला आहे. देशाचे राज्यकर्ते या नात्याने आपण त्याची केवळ जबाबदारी स्वीकारल्याचे त्यांनी म्हटले होते. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)