गरीबीविरोधात चीनचा ऐतिहासिक विजय; 77 कोटी गरीबांना काढलं दारीद्र्यातून बाहेर

china poverty
china poverty

बीजिंग : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आज गुरुवारी चीनसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलंय की, गेल्या चार दशकांमध्ये 77 कोटींहून अधिक लोकांचा आर्थिक स्तर सुधारण्यात चीनला यश आलेलं आहे. गरीबी विरोधातील या लढाईमध्ये चीनने संपूर्णपणे विजय प्राप्त केला आहे. त्यांनी म्हटलंय की, हा चीनद्वारे केला गेलेला एक चमत्कारच आहे, जो इतिहासाच्या पानांवर नोंदवला जाईल. शी यांनी गरीबी निर्मूलनामध्ये देशाने पार पाडलेल्या ऐतिहासिक कामगिरीबाबत बोलताना म्हटलं की, जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशामध्ये आता गरीबीचे पूर्णपणे निर्मूलन झाले आहे. सध्या चीनची लोकसंख्या जवळपास 1.4 अब्ज आहे. 

शी यांनी म्हटलं की, ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व गरीब लोकांना गरीबीतून बाहेर काढलं गेलं आहे. तसेच त्यासोबतच चीनने 2030 च्या ठरवलेल्या मर्यादेच्या 10 वर्षे आधीच गरीबी निर्मूलबाबतचे संयुक्त राष्ट्रामधील ध्येय प्राप्त केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, गेल्या आठ वर्षांहून अधिक वर्षांमध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या शेवटच्या 9.899 कोटी गरीब लोकांना देखील गरीबीतून बाहेर काढलं गेलं आहे. सर्व 832 गरीब काउंटी आणि 1,28,000 गरीब गावे दारीद्र्याच्या यादीतून बाहेर आलेली आहेत. शी यांनी म्हटलं की, 1970 च्या दशकाच्या शेवटाला सुरु केलेल्या या सुधारणांपासून ते आतापर्यंत चीनने उपलब्ध दारीद्र्यरेषेच्या अनुसार 77 कोटी गरीब लोकांना दारीद्र्यातून बाहेर काढलं आहे.

त्यांनी म्हटलं की, चीनने या काळात जागतिक स्तरावर गरीबीमध्ये झालेल्या घटामध्ये जवळपास 70 टक्क्यांहून अधिक योगदान दिले आहे. शी यांनी म्हटलं की, या विकासासह चीनने एकप्रकारे चमत्कारच केला आहे, जो इतिहासाच्या पानांवर नोंद केला जाईल. शी यांनी 2012 च्या शेवटाला सत्ता हातात घेतली होती आणि तेंव्हा त्यांनी गरीबीचे पूर्णपणे निर्मूलन करण्याचे आपले ध्येय ठरवले होते. त्यावेळी चीनमध्ये जवळपास 10 कोटी लोक गरीब होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com