LIVE: भारत-चीन सैन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत काय तोडगा निघणार?

टीम ई-सकाळ
Saturday, 6 June 2020

एका बाजूला सीमारेषेवर दोन्ही देशातील सैन्याकडून हालचाली सुरु असताना चर्चेतून प्रश्न मार्गी काढण्याचे प्रयत्न देखील सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये आज विशेष बैठक होत आहे. या बैठकीतून मुद्दा निकाली लागणार की वाद आणखी चिघळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

पूर्व लडाख सीमारेषेवर भारत-चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांनी सीमारेषेवर अतिरिक्त फौजफाटा तैनात केल्यामुळे भारत-चीन यांच्यातील वादग्रस्त मुद्याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. एका बाजूला सीमारेषेवर दोन्ही देशातील सैन्याकडून हालचाली सुरु असताना चर्चेतून प्रश्न मार्गी काढण्याचे प्रयत्न देखील सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये आज विशेष बैठक होत आहे. या बैठकीतून मुद्दा निकाली लागणार की वाद आणखी चिघळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारताचे  नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह करणार आहेत.

.. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले इराणचे आभार 

या बैठकीआधी दोन्ही देशांचे सैनिक काहीसे मागे हटल्याचे वृत्त देखील समोर आले होते. मात्र, सैन्याने याबाबत अधिकृतपणे काही सांगितलं नाही. दोन्ही देश चर्चेसाठी तयार झाले असल्याने यातून काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल. याआधीही लदाख परिसरातील वादग्रस्त मुद्यावरुन दोन्ही देशांत अनेक चर्चा झाल्या आहेत. पैंगोग, गालवान व्हॅली भागात चीनने मोठ्या प्रमाणात सैन्य तैणात केले होते. तसेच चिनी सैन्य तिबेटच्या भागात युद्ध अभ्यासही सुरु केलाय. भारतानेही आक्रमक पवित्रा घेत युद्धजन्य परिस्थितीस तयार असल्याचे संकेत दिल्यानंतर चीनच्या सैन्याच्या हालचाली थोड्या मंदावल्या होत्या.

पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य ; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ladakh standoff india china border talks latest updates