esakal | ‘मेड इन चायना’ला धक्का; अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर
sakal

बोलून बातमी शोधा

America Sansad

महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या कार्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अमेरिकेतील संसदीय समितीने एक विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचा मसुदा नुकतेच निधन झालेले नागरी हक्क चळवळीचे नेते जॉन लुईस यांनी तयार केला होता. 

‘मेड इन चायना’ला धक्का; अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - अमेरिका आणि चीनमधील संबंध विकोपाला गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक सादर करण्यात आले आहे. यानुसार, ॲमेझॉनसारख्या कंपन्यांनी त्यांच्यातर्फे विक्री केल्या जाणाऱ्या चिनी वस्तू ‘मेड इन चायना’ असल्याचे स्पष्ट करणे आवश्‍यक करण्यात येणार आहे. या कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळांवर अथवा ॲपवर चिनी वस्तूंची विक्री करताना ही माहिती स्पष्ट करणे आवश्‍यक केले जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच, दुसरीकडे गांधीजींच्या कार्यप्रसारासाठीही अमेरिकेत विधेयक मंजूर केले आहे. महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या कार्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अमेरिकेतील संसदीय समितीने एक विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचा मसुदा नुकतेच निधन झालेले नागरी हक्क चळवळीचे नेते जॉन लुईस यांनी तयार केला होता. 

राम मंदिराच्या भूमिपूजनाची अमेरिकेतही चर्चा; टाईम्स स्क्वेअरवर झळकणार श्रीरामाची प्रतिमा

‘गांधी-किंग एक्सचेंज ॲक्ट’ या नावाचे विधेयक भारतीय वंशाच्या सदस्या ॲमी बेरा यांनी मांडले होते. या विधेयकानुसार, महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी भारत आणि अमेरिका हे देश एकमेकांच्या सहकार्याने देवाणघेवाण यंत्रणा निर्माण करतील. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्याने दोन्ही देशांमधील विचारवंतांसाठी शैक्षणिक फोरमची स्थापना करेल. तसेच, वादांच्या मुद्यावर अहिंसेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठीही पुढाकार घेतला जाणार आहे. भारतातील सामाजिक, पर्यावरणीय व आरोग्य प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी संस्थाही स्थापन केली जाणार आहे.

Edited By - Prashant Patil