'कलम ३७०'ला विरोध करणाऱ्या महाथीर मोहंमद यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
Monday, 24 February 2020

महाथीर हे १९८१ ते २००३ या काळात पंतपप्रधान होते. अन्वर यांच्याकडे सत्ता सोपविण्यासाठी त्यांनी मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा केली होती. पण त्याची तारीख जाहीर करण्यास सातत्याने टाळाटाळ केली.

क्लालालंपूर : मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहंमद यांनी सोमवारी (ता.२४) पदाचा राजीनामा दिला. त्यांचे वारसदार अन्वर इब्राहीम यांना पदापासून दूर ठेवून नवे आघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने महाथीर यांनी हे पाऊल उचलल्याचा अंदाज विश्‍लेषकांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्वर यांनी स्थापन केलेल्या ‘पॅक्ट ऑफ होप’ या आघाडीत त्यांना वाढता विरोध होऊ लागला आहे. शिवाय विरोधी नेत्यांनी नवे सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केल्याने महाथीर यांनी अचानक पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने देशात खळबळ उडाली आहे. आघाडी सरकारमध्ये अन्वर यांना वगळण्याची दाट शक्यता आहे.

अन्वर हे महाथीर यांचे वारसदार समजले जातात. ते पूर्वी महाथीर विरोधक होते. पुरुषांमधील समलैंगिकतेच्या प्रश्नावरून त्यांना अनेक वर्षे तुरुंगवास भोगावा लागला आहे. अन्वर व महाथीर हे ९४ वर्षांचे नेते जगातील सर्वांत वयोवृद्ध नेते आहेत. या दोन्ही नेत्यांमधील संबंध अत्यंत वादळी होते. पण भ्रष्टाचारी सरकार उलथवून लावण्यासाठी हे दोघे २०१८ मधील निवडणुकीत एकत्र आले. 

- Video: ताज महाल पाहून ट्रम्प भारावले; व्हिजिटर्स बुकमध्ये काय म्हणाले पाहा!

महाथीर हे १९८१ ते २००३ या काळात पंतपप्रधान होते. अन्वर यांच्याकडे सत्ता सोपविण्यासाठी त्यांनी मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा केली होती. पण त्याची तारीख जाहीर करण्यास सातत्याने टाळाटाळ केली. सत्ताधारी आघाडी सरकारचे भवितव्य सोमवारी (ता.२४) सकाळपर्यंत अधांतरी असतानाच महाथीर यांनी मलेशियाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा पाठविला असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने सोमवारी दुपारी एक वाजता मलेशियाच्या राजाला दिली. यासाठी कोणतेही कारण देण्यात आले नाही.

- सोन्याच्या दरांवर कोरोनाचा परिणाम; 2013नंतरचा उच्चांकी दर

भारतविरोधी घेतली होती भूमिका 

दरम्यान, महाथीर मोहंमद यांनी वारंवार भारतविरोधी भूमिका घेतल्या होत्या. काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा मुद्दा, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) याविषयी पाकचं समर्थन करणारे वक्तव्य मोहंमद यांनी केली होती. परिणामी, भारताने मलेशियाकडून पाम ऑइल आयातीवर बंदी घातली.

महाथीर मोहंमद यांच्याविषयी : 

जगातील सर्वात वयोवृद्ध नेते अशी महाथीर यांची ओळख आहे. ते ९४ वर्षांचे असून राजकारणातले चाणाक्ष खेळाडू अशी त्यांची विशेष ओळख आहे. १९८१ ते २००३ पर्यंत त्यांनी मलेशियाचे पंतप्रधानपद भूषविले. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये त्यांनी नझीब रझाक यांचा पराभव करत पंतप्रधान म्हणून मलेशियाचे प्रतिनिधित्व केले होते.

- जन्माला आल्यानंतर 'ती' रडली नाही तर चिडली; फोटो होतोय व्हायरल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malaysian prime minister Mahathir Mohamad resigns