एकाने लैंगिक क्षमतेसाठी घेतलं रेड्याचं औषध मग...

वृत्तसंस्था
Thursday, 16 January 2020

एका व्यक्तीने लैंगिक क्षमता वाढण्यासाठी रेड्याचे औषध घेतले. औषधामुळे त्या व्यक्तीची अवस्था बिकट झाली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. अखेर, प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया करावी लागली.

मेक्सिको: एका व्यक्तीने लैंगिक क्षमता वाढण्यासाठी रेड्याचे औषध घेतले. औषधामुळे त्या व्यक्तीची अवस्था बिकट झाली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. अखेर, प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया करावी लागली.

विवाहानंतर कळलं 'ती' निघाली 'तो' अन्....

मेक्सिकोमध्ये घडलेल्या विचित्र घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका व्यक्तीला 30 वर्षीय महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवायचे होते. शारिरीक संबंधापूर्वी लैंगिक क्षमता वाढण्यासाठी त्याने चक्क रेड्यांची लैंगिक क्षमता वाढणारे औषध घेतले. काही वेळानंतर त्या व्यक्तीची शारिरीक क्षमता बिकट झाली. मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, पुढील उपचार सुरू आहेत.

प्रेयसीला रात्री शेतात भेटायला बोलावले अन्‌...

'संबंधित व्यक्तीने व्हेराक्रूझ शहरामधून हे औषध विकत घेतले. या औषधाचा वापर शेतकरी ब्रीडिंगवेळी रेडे अथवा बैलांची लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी वापरतात. मात्र, व्यक्तीनेच ते औषध घेतल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले,' असे डॉक्टरांनी सांगितले.

शुद्धीवर आले तेंव्हा ड्रायव्हर बलात्कार करत होता...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man hospitalised after taking sexual stimulant used for breeding bulls in mexico