शुद्धीवर आले तेंव्हा ड्रायव्हर बलात्कार करत होता...

वृत्तसंस्था
Tuesday, 14 January 2020

एका पार्टीमध्ये दारू घेतली आणि पार्टी संपल्यानंतर टॅक्सीने घरी निघाले होते. प्रवासादरम्यान झोप लागली. पण, झोपेतून जागे झाले तेंव्हा ड्रायव्हर बलात्कार करत होता, अशी तक्रार एका महिलेने पोलिसांकडे केली आहे. अमेरिकेतील फोंटाना येथे ही घटना घडली आहे.

कॅलिफोर्निया : एका पार्टीमध्ये दारू घेतली आणि पार्टी संपल्यानंतर टॅक्सीने घरी निघाले होते. प्रवासादरम्यान झोप लागली. पण, झोपेतून जागे झाले तेंव्हा ड्रायव्हर बलात्कार करत होता, अशी तक्रार एका महिलेने पोलिसांकडे केली आहे. अमेरिकेतील फोंटाना येथे ही घटना घडली आहे.

महिलेने केला अल्पवयीन मुलावर बलात्कार...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती मित्रांसह पार्टीनंतर रात्री आपल्या घरी निघाली होती. प्रवासासाठी तिने उबर टॅक्सी बुक केली होती. प्रवासादरम्यान महिलेला झोप लागल्यानंतर ड्रायव्हरने बलात्कार केला. संशयित उबर चालकाचे नाव अलोन्सो कॅले आहे. त्याने आहे. त्याने स्वत: पोलिसांकडे संपर्क साधला असून, लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. पण, महिलेच्या परवानगीनेच संबंध ठेवल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितले.

प्रियकर हवा पण स्वतःचे बाळ नको म्हणून तिने...

अलोन्सो म्हणाला, 'फोंटाना येथील मॅक्डर्मोट पार्कमध्ये महिलेबरोबर संबंध ठेवले. पण, आता ती बलात्काराचा आरोप करत असून, ती खोटे बोलत आहे. घटना घडली त्यावेळी नशेत असल्यामुळे तिच्या लक्षात नसावे.'

प्रेयसी कोणत्याही वेळी घरी यायची अन्...

दरम्यान, पोलिसांनी बलात्काराच्या आरोपावरून अलोन्सोविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकही करण्यात आली असून, न्यायालयात हजर केले जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uber driver arrested in rape case on drunk lady passenger in usa