लशीपेक्षाही मास्कचा वापर अधिक उपयुक्त; अमेरिकन तज्ञांचा निर्वाळा

Amrica Mask
Amrica Mask

मास्कचा वापर हा कोरोनावरील लशीपेक्षा अत्यंत प्रभावी आहे, असा निर्वाळा सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन या संस्थेचे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी दिला आहे.  

अमेरिकेच्या सिनेटमध्ये उपसमितीच्या बैठकीत विचारलेल्या प्रश्नांना रॉबर्ट रेडफिल्ड उत्तर देत होते.  त्यांनी सांगितले की, तोंड आणि नाक संपूर्णत: अच्छादणारे मास्क हे कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्याचे अंत्यत महत्वपूर्ण साधन आहे. ते एखाद्या लशीपेक्षाही अधिक उपयुक्त आहे, असे आम्ही केलेल्या पाहणीतून आढळले आहे.

काय आहे जगभरातील लशींची अवस्था? -  पहा हा व्हिडीओ...

असे म्हटले जात आहे की, अमेरिकेत कोरोनाची प्रतिबंधक लस ही या वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या प्रारंभी उपलब्ध होईल. परंतु, एकूण साथ आटोक्यात आणण्यासाठी ती कितपत उपयुक्त ठरेल, हे आताच कुणालाही सांगता येणार नाही. तसेच घाईगडबडीत आणि जलदगतीने तयार केलेली लस ही रोगाला अटकाव घालण्यासाठी फारशी उपयुक्त ठरणार नाही, असेही काही संशोधकांचे म्हणणं आहे.

लस उपलब्ध झाली तरीही रोगाला अटकाव घालण्यासाठी आवश्यक ते सर्व नियम हे पाळावेच लागतील. लस घेतल्यानंतरही लोकांनी तोंड आणि नाक झाकेल, यापद्धतीने मास्क हा लावलाच पाहिजे. असे केल्यास साथीवर नियंत्रण मिळवणे, हे लवकर शक्य होईल. लस बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पण ती लस पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी किंवा तिसऱ्या तिमाहीच्या सुरवातीलाच उपलब्ध होऊ शकेल. 

कोरोनावरील लस येत्या नोव्हेंबरमध्येच उपलब्ध होईल असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. परंतु, हे शक्य नसून नोव्हेंबरमध्ये राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक असल्याने ट्रम्प मतदारांना आकर्षित करण्यासाठी असा खोटा प्रचार करत आहेत, असा आरोप डेमोक्रॅटीक पक्षाने केला आहे. सध्या अमेरिकेत आॅक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनिसा यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार होऊ घातलेल्या लसीवर आणि फायझर कंपनीकडून बनविल्या जाणाऱ्या लसीवर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

जगाचा विचार करायचा झाल्यास अमेरिकेत सर्वात अधिक रुग्ण आहेत. सध्या 60,00,000 हून अधिक रुग्णांची संख्या असून त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. , देशात गुरुवारी कोरोनाचे ९७,८९४ नवे रुग्ण आढळून आले असून, हा एका दिवसातील रुग्णसंख्येचा आजवरचा उच्चांक आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ५१ लाखांवर पोहोचली आहे, 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com