

Mexico Hermosillo Blast
ESakal
मेक्सिकन शहरातील हर्मोसिलो येथील एका सुपरमार्केटमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार मुलांचा समावेश आहे. या घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. डे ऑफ द डेड फेस्टिव्हल दरम्यान ही दुर्घटना घडली. राष्ट्रपती शीनबॉम यांनी शोक व्यक्त केला आहे. सोनोराच्या राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सोनोरा रेड क्रॉस सोसायटीने पोलिसांसह बचाव कार्य हाती घेतले. पोलिसांसह आणि १० रुग्णवाहिकांसह ४० रेड क्रॉस स्वयंसेवकांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवले.