मायक्रोसॉफ्टकडून कर्मचाऱ्यांना कायमचं 'वर्क फ्रॉम होम'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

कोरोनामुळे मायक्रोसॉफ्टचे बहुतांश कर्मचारी अजूनही घरुन काम करत आहेत आणि कंपनीला जानेवारीपर्यंत अमेरिकेतील आपले कार्यालय पुन्हा सुरु होण्याची आशा नाही. 

नवी दिल्ली- सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना कायमचे घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. जर कर्मचाऱ्यांनी हा पर्याय निवडला तर ते घरातून काम करणे सुरु ठेवू शकतात. अमेरिकेतील माध्यमांनी शुक्रवारी हे वृत्त दिले आहे. कोविड-19 मुळे सुरु करण्यात आलेल्या 'वर्क फ्रॉम होम' बाबत असा निर्णय घेणारी मायक्रोसॉफ्ट ही पहिली कंपनी ठरली आहे. 'द व्हर्ज'ने म्हटले की, कोरोनामुळे मायक्रोसॉफ्टचे बहुतांश कर्मचारी अजूनही घरुन काम करत आहेत आणि कंपनीला जानेवारीपर्यंत अमेरिकेतील आपले कार्यालय पुन्हा सुरु होण्याची आशा नाही. 

मायक्रोसॉफ्टच्या अधिकारी कॅथलीन होगन यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, कोरोनाने आपल्या सर्वांना विचार करण्याचे, जगण्याचे आणि काम करण्याचे आव्हान दिले आहे. आम्ही स्वतंत्र कार्य शैलीचे समर्थन करण्यासाठी शक्य तितकी लवचिकता देऊ. कामाच्या गरजा संतुलित करताना आणि आपली संस्कृती जगताना आम्ही हे निश्चित करू.

हेही वाचा- मोरॅटोरियमप्रकरणी केंद्राने सुप्रीम कोर्टाला सांगितलं, आणखी दिलासा देऊ शकत नाही

आम्ही कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी घरुन काम करण्याबाबत सांगितलेलं नाही. पण आमचे लक्ष्य आहे की, आम्ही काळानुसार काम करु. कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कार्यशैली आणि व्यावसायिक गरजांचे समर्थन करण्यासाठी प्रतिबद्ध असले पाहिजे, असे मायक्रोसॉफ्टच्या एका प्रवक्त्याने सांगितल्याचे वृत्त 'एएफपी'ने दिले आहे. 

हेही वाचा- नदीतून शस्त्रास्त्रांची तस्करी; भारताने उधळला पाकचा डाव

बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना अमेरिकेत किंवा विदेशात स्थानांतर करणे शक्य आहे. जे लोक स्थानांतर करतील, त्यांना त्यांच्या वेतनाच्या बदल्यात कोठे जातात यावर आधारित बदल होतील. कंपनी कर्मचार्‍यांच्या घरातील कार्यालयाचा खर्च देईल, पण त्या ठिकाणी स्थानांतराचा खर्च दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  

हेही वाचा- रेल्वे रिझर्व्हेशनच्या नियमांत आजपासून महत्वाचे बदल; प्रवाशांना होणार फायदा

दरम्यान, जूनच्या अखेरपर्यंत कंपनीत 1,63,000 कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये अमेरिकेत 96 हजार जण काम करत होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील फेसबुकसारख्या काही प्रमुख कंपन्यांनी या आधीच कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास परवानगी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: microsoft allows its employees to work from home permanently