
Microsoft करणार कर्मचाऱ्यांची दुप्पट पगारवाढ; CEO सत्या नडेला म्हणाले..
मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण त्यांची लवकरच पगारवाढ होणार आहे. कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी या माहितीला दुजोरा दिलाय. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या ईमेलमध्ये सांगितले की मायक्रोसॉफ्टने ग्लोबल मेरीट बजेट जवळपास दुप्पट केले आणि त्यामुळे ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुप्पट पगारवाढ देणार आहे. (Microsoft employees will get a salary hike soon As CEO Satya Nadella says)
जगभरातील मोठमोठ्या टेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करताना दिसून येत आहे. आता यात मायक्रोसॉफ्टची ही भर पडली. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा करणारी मायक्रोसॉफ्ट ही एकमेव कंपनी नाही. याआधी Amazon ने फेब्रुवारीमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ केले होती तर जानेवारीमध्ये गुगलनेही आपल्या चार उच्च अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ केली होती.
हेही वाचा: मोदींचा दौरा : दृढतेतून मानवतेला लाभ; नेपाळशी मैत्री हिमालयासारखी
कंपनीने कर्मचाऱ्यांना मेल मध्ये समोर लिहले आहे “आपल्या कंपनीला मार्केटमध्ये उत्तम मागणी आहे तुम्ही करत असलेल्या अथक परिश्रमामुळे.त्यासाठी तुमचे मनापासून कौतुक केले जात आहे. त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानू इच्छितो. म्हणूनच आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये दीर्घकालीन इनवेस्टमेंट करत आहोत”
हेही वाचा: फ्रान्सला मिळाली दुसरी महिला पंतप्रधान; एलिझाबेथ बोर्न यांची नियुक्ती
सोबतच नडेला यांनी कर्मचाऱ्यांना असेही सांगितले की नुकसानभरपाईमध्येही कंपनी लक्षणीय अतिरिक्त गुंतवणूक करत आहे, जी सामान्य बजेटच्या पलीकडे आहे. नडेला पुढे म्हणाले, ”आम्ही ग्लोबल मेरीट बजेट जवळजवळ दुप्पट करत आहोत. सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात आम्ही वार्षिक स्टॉक रेंजमध्ये किमान 25 टक्क्यांनी वाढ करत आहोत.
या वेतनवाढीचा फायदा नक्कीच मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना होणार, ह निश्चितच आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Web Title: Microsoft Employees Will Get A Double Salary Hike Soon As Ceo Satya Nadella Says
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..