मायक्रोसॉफ्ट कंपनी घेणार आता ‘रोबो’ची मदत

Microsoft
Microsoft

न्यूयॉर्क - मायक्रोसॉफ्ट कंपनी आपल्या बातम्यांच्या ‘एमएसएन’ या वेबसाईटसाठी आता हंगामी तत्वावरील सुमारे डझनभर पत्रकारांच्या जागी ‘रोबो’ची नियुक्ती करणार आहे. अमेरिका, इंग्लंडमधील बातम्या निवडणे, बातम्या लिहणे हे काम आता स्वयंचलित रोबो यंत्रणा करणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एमएसएन वेबसाईटसाठी वेगवेगळ्या वृत्तसंस्थांकडून आलेल्या बातम्या निवडणे, त्यांना शिर्षक देणे, फोटो निवडणे हे काम सध्या पत्रकारांकडून केले जाते. यापुढे या कामासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे. वृत्तपत्र व्यवसाय अद्ययावत करण्याचा हा भाग आहे,  असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे की, ‘‘अन्य कंपन्यांप्रमाणेच आम्ही आमचा उद्योग नियमित तत्वावर अद्ययावत करत आहोत. त्यामुळे नव्याने काही ठिकाणी गुंतवणूक निर्माण होऊ शकते तसेच नवे रोजगारही तयार होतील. मात्र, हा कोरोनाशी संबंधित निर्णय किंवा त्याचा परिणाम नाही.’’ 

अन्य तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणेच मायक्रोसॉफ्ट वृत्तसंस्थांना त्यांच्या कंटेंटबद्दल मोबादला देते. पण, कोणती बातमी प्रसिद्ध करायची किंवा ती कशाप्रकारे मांडायची याचा निर्णय पत्रकार कर्मचारी घेतात. 

साधारणपणे कंत्राटी तत्त्वावरील ५० न्यूज प्रोड्यंसर्सना जून अखेरीस आपली नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. मात्र, त्याचवेळी पूर्णवेळ काम करणारे पत्रकार कामावर असतील. नोकरी गमावणाऱ्यांपैकी २७ जण हे इंग्लंडच्या ‘पीए मीडिया’चे कर्मचारी आहेत.

गुगलचेही नवे प्रकल्प
मायक्रोसॉफ्टप्रमाणेच गुगलही बातम्यांशी संबंधित काही प्रकल्प स्वयंलचित यंत्रणेद्वारे चालविण्याच विचार करत आहे. दरम्यान, काही पत्रकारांनी अशाप्रकारे, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे संपादकीय मार्गदर्शक तत्वे पाळली जाऊ शकणार नाहीत, असे म्हटले आहे. एका पत्रकाराने लिहिले आहे की, ‘लवकरच स्वयंचलित यंत्रणा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता पत्रकारांचे काम हिरावणार असल्याचे मी नेहमी वाचत असे, पण आज माझीच नोकरी हिरावली गेली आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com