Crisis: जगावर राज्य करणारे इंग्रज दोनवेळच्या जेवणाला महाग; परिस्थिती हाताबाहेर

Economic Crisis news in Marathi
Economic Crisis news in Marathi

लंडन - जगावर मंदीचं सावट आहे. त्यातच इंग्लंडमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं चित्र आहे. इंग्लंडमध्ये वीज बिल वाढीवर लावण्यात आलेले बंधनं आता हटवण्यात आली आहे. त्यामुळे इंधनाच्या बाबतीत आगामी काळात अनेक लोक गरिबीचा सामना करू शकतात, असा दावा एका कंज्युमर ग्रुपने केला आहे. (Economic Crisis news in Marathi)

Economic Crisis news in Marathi
Martial law : विलीन प्रदेशांमध्ये ‘मार्शल लॉ’ लागू; व्लादिमीर पुतीन

इंग्लंडमध्ये लोकांना दैनंदिन गरज भागवणे कठीण झालं असून या अडचणींवर मात करण्यासाठी लाखो लोक दिवसात एकवेळच जेवण घेत आहेत. इंग्लंडमधील महागाई दर सप्टेंबरमध्ये १० टक्क्यांवर पोहोचला असून नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या नेतृत्वात इंग्लंडला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

कंज्युमर ग्रुप 'विच'ने ३ हजार लोकांच्या सर्वेक्षणानंतर म्हटलं की, ब्रिटनमधील अनेक कुटुंबे तीन किंवा चार वेळा जेवण करायचे. मात्र आता त्यांनी आपल्या जेवणात कपात केली आहे. सध्याच्या घडीला सुमारे ८० टक्के लोक आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.

Economic Crisis news in Marathi
Pregnancy : गरोदर असल्याचे कळल्यानंतर अवघ्या ४८ तासांत महिलेने दिला बाळाला जन्म

'विच'च्या फुड पॉलिसीचे प्रमुख स्यू डेव्हिस म्हणाले की, दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किंमतींच्या समस्येचा अत्यंत वाईट परिणाम होत आहे. लाखो लोक कमी अन्न खात असून त्यांच्या ताटातील आता पौष्टिक आहाराचे प्रमाण कमी झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com