

नेपाळ सरकारने भारतीय आंब्यांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे. आयात केलेल्या काही खेपांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशकांचे अंश आढळल्याचे कारण देत नेपाळच्या कृषी आणि पशुधन विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. एप्रिल-मे महिन्यापासून सीमावर्ती क्वारंटाईन केंद्रांना भारतीय आंब्यांचा प्रवेश रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.