Nepal flood unidentified bodies DNA samples
esakal
काठमांडू : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पुराच्या ढिगाऱ्यांमधून आतापर्यंत ६८२ मृतदेह बाहेर काढण्यात आले (Nepal flood death toll 682) असून, अनेक मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. मात्र, अद्याप काही मृतदेहांची ओळख पटलेली नाही. अशा मृतदेहांवर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार न करता त्यांची ओळख भविष्यात पटवता यावी, यासाठी नेपाळ सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.