भारत-नेपाळ सीमेवर अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
Friday, 12 June 2020

बिहारमधील भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून आज (शुक्रवार) अंदाधुंद गोळीबार करण्यात आला असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली : बिहारमधील भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून आज (शुक्रवार) अंदाधुंद गोळीबार करण्यात आला असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाकिस्तानला धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल...

भारत आणि नेपाळ सीमेवरून दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीतच बिहारमधील भारत नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. भारत-नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या गावात नेपाळकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका भारतीया नागरिकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानचा सर्वात मोठा कट उधळला...

पिपरा परसाईन पंचायतीच्या जानकी नगर सीमेवर काही जण शेतात काम करत होते. त्याचवेळी नेपाळच्या बाजूकडून अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि दोन जण त्यात जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nepal police opens fire at indian farmers near border area in bihars sitamarhi one dead