esakal | चीनविरोधात अमेरिकन नेत्यांची आघाडी; राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना साकडे

बोलून बातमी शोधा

america joe biden}

सीनेटर रिक स्कॉट यांनी अध्यक्षांना लिहलेल्या पत्रात चीनच्या मानवाधिकार उल्लंघनाबाबत आणि अत्याचाराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घ्यावी, असे आवाहन केले.

चीनविरोधात अमेरिकन नेत्यांची आघाडी; राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना साकडे
sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन - चीनमध्ये मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत भारतीय वंशाच्या खासदार निक्की हेली यांच्यासह आघाडीच्या रिपब्लिकनच्या नेत्यांनी चीनमधील 2022 हिवाळी ऑलिंपिकवर अमेरिकेने बहिष्कार घालावा, असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर अन्य ठिकाणी हिवाळी ऑलिपिंक भरवावे, असेही म्हटले आहे. दरम्यान, व्हाइट हाऊसने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे म्हटले आहे.

बीजिंग येथे 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2022 यादरम्यान हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होत आहे. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी प्रतिनिधी भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी म्हटले की, चीन आपल्या जहाल कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी हिवाळी ऑलिंपिकचा उपयोग करत आहे आणि ही बाब सर्व जगाला ठावूक आहे. अध्यक्ष बायडेन यांनी या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करावे आणि यासाठी आपण अभियान सुरू केले आहे.

हे वाचा - जगातील कर्मचाऱ्यांना बायडन यांचा दिलासा; ट्रम्प यांचा ग्रीन कार्डबाबतचा निर्णय रद्दबातल

चीनमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असताना ते दडपण्यासाठी हिवाळी ऑलिंपिकचा केला जाणारा वापर हे आम्ही उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. याबाबत हेली यांनी बायडेन यांना पत्र लिहले असून त्यात म्हटले की, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचे उल्लंघन होते. त्यामुळे हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे स्थान बदलावे, अशी आमची मागणी आहे.

हेही वाचा - कॅनडामध्ये आकाशात दिसली मोठी पेटलेली उल्का; अण्वस्त्र हल्ल्याच्या भीतीने घाबरगुंडी

पत्रात काय म्हटले?
सीनेटर रिक स्कॉट यांनी अध्यक्षांना लिहलेल्या पत्रात चीनच्या मानवाधिकार उल्लंघनाबाबत आणि अत्याचाराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घ्यावी, असे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने चीनऐवजी अन्य ठिकाणी हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा भरवण्याचा विचार करावा, असेही नमूद केले आहे दरम्यान, अमेरिकेसह अन्य देशांनी देखील चीनवर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे आरोप केले आहेत. चीनमध्ये शिजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांचे हत्यकांड होत असल्याचे गंभीर आरोप केले जात आहेत. कॅनडाने देखील चीनला हत्याकांड घडवून आणणारा देश, असे म्हटले होते.