चीननेही नाकारली मध्यस्थी...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 मे 2020

भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या सीमावादात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी चीन सरकारने नाकारली आहे. दोघांमधील वाद मिटविण्यासाठी तिसऱ्याची गरज नसल्याचे चीनने म्हटले आहे.

बीजिंग : भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या सीमावादात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी चीन सरकारने नाकारली आहे. दोघांमधील वाद मिटविण्यासाठी तिसऱ्याची गरज नसल्याचे चीनने म्हटले आहे. भारत सरकारनेही ट्रम्प यांच्या मध्यस्थीला नकार दिला आहे.

विमानाच्या ढिगाऱयाखाली सापडले कोट्यवधी रुपये...

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनदरम्यान सीमावाद उफाळून आला आहे. दोन देशांमधील तणाव वाढत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवित सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. मात्र, द्वीपक्षीय वादात तिसऱ्याचा हस्तक्षेप नको, हे धोरण कायम ठेवत अमेरिकेला नकार कळविला. चीननेही आज प्रथमच ट्रम्प यांच्या ‘ऑफर’वर मतप्रदर्शन केले. ‘दोन्ही देशांना मध्यस्थी नको आहे. भारत आणि चीन यांच्यात चर्चेचे सर्व मार्ग खुले आहेत. या माध्यमातून आमचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे तिसऱ्या देशांच्या मदतीची आम्हाला गरज नाही,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी सांगितले.

Video: टोळधाडीवर शेतकऱयाने लढवली शक्कल...

मोदी चीनवर नाराज : ट्रम्प
वॉशिंग्टन : माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले असून चीनबरोबर निर्माण झालेल्या वादामुळे ते नाराज आहेत, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेतील माध्यमांना मी जितका प्रिय आहे, त्यापेक्षा अधिक भारतात मी लोकप्रिय आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर माझे चांगले मित्र असून ते एक सद्‌गृहस्थ आहेत. भारत आणि चीनमध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. दोघांचे लष्कर सामर्थ्यशाली आहे. या वादामुळे मोदी नाराज झाल्याचे मला दिसून आले आहे.

...अन् 'त्या' व्हिडिओमुळे सापडले वडील!

चीनबाबत उद्या काही निर्णय
वॉशिंग्टन : कोरोनाचा प्रसार चीनमुळेच झाला, असा दावा असलेल्या अमेरिकेने चीनबाबत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन हे निर्णय जाहीर केले जातील, असे अमेरिका सरकारने सांगितले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका चीनवर व्यापार निर्बंध टाकण्याची शक्यता आहे. यामुळे दोन देशांमधील व्यापार युद्ध आणखी भडकू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no need for a third party to mediate between china and india says china after trump offer