esakal | भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत आहे झपाट्याने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

चिंतेचे कारण

  • रुग्णसंख्यावाढीचा वेग मोठा
  • सलग सहाव्या दिवशी दहा हजारांहून अधिक नवे रुग्ण
  • लोकसंख्या अधिक असलेल्या शहरांमध्ये रुग्ण अधिक
  • चाचण्या अत्यंत कमी

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत आहे झपाट्याने वाढ

sakal_logo
By
पीटीआय

न्यूयॉर्क - भारतात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून बिहार, उत्तर प्रदेशसारख्या दाट लोकसंख्येच्या राज्यांमध्ये संसर्ग वाढल्यास देशात उद्रेक होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतात गेल्या चोवीस तासांमध्ये विक्रमी १५,४०० हून अधिक कोरोनाबाधित सापडले असून, यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या चार लाखांच्यावर पोचली; तसेच तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्याही १३,२५० हून अधिक झाली आहे. 

अमेरिकेनंतर ब्राझील बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; मृतांची संख्या झाली एवढी

भारतातील कोरोना संसर्गाबाबत बोलताना हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आशिष झा म्हणाले की, भारतात वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेत टाकले आहे. रुग्णसंख्या वाढण्यामागे प्रचंड लोकसंख्या हा एक घटक आहे.

बॉयकॉट चायनीज प्रॉडक्ट मोहिमेचं चीनला मिरच्या झोंबल्या; वाचा चीनचा ग्लोबल टाईम्स काय म्हणतोय...

चिंतेचे कारण

  • रुग्णसंख्यावाढीचा वेग मोठा
  • सलग सहाव्या दिवशी दहा हजारांहून अधिक नवे रुग्ण
  • लोकसंख्या अधिक असलेल्या शहरांमध्ये रुग्ण अधिक
  • चाचण्या अत्यंत कमी