esakal | सर्वात धोकादायक कोरोना स्ट्रेन, तासभर राहतो हवेत

बोलून बातमी शोधा

corona

भारताच्या शेजारी देशात आतापर्यंतचा सर्वाधित धोकादायक कोरोना स्ट्रेन मिळाला आहे. हा स्ट्रेन हवेत जवळपास एक तासापर्यंत राहू शकतो.

सर्वात धोकादायक कोरोना स्ट्रेन, तासभर राहतो हवेत
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलंबो : भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. जगभरातील संशोधकांनी लस शोधत असून काही प्रमाणात यशही मिळालं आहे. मात्र, कोरोनाचा विषाणू काळानुरुप आणि परिस्थितीनुसार आपलं रुप बदलत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. यातच भर म्हणून भारताच्या शेजारी असलेल्या श्रीलंकेत आतापर्यंतचा सर्वाधित धोकादायक कोरोना स्ट्रेन मिळाला आहे. हा स्ट्रेन हवेत जवळपास एक तासापर्यंत राहू शकतो. श्रीलंकेत मिळालेला स्ट्रेन हा आतापर्यंतचा सर्वात घातक कोरोना विषाणू असल्याचं म्हटलं जातेय.

श्रीलंकेत मिळालेला कोरोना विषाणून हवेतून (एयरबोर्न ) संक्रमित होतो. म्हणजेच, एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात न आल्यानंतरही तो विषाणू हवेमार्फत तुम्हाला संक्रमीत करु शकतो. श्रीलंकेतील जयवर्देनापुरा यूनिवर्सिटीमध्ये इम्यूनोलिजी एण्ड मॉलिक्युलर सांयसेज विभागाच्या प्रमुख नीलिका मालाविगेने यांनी शनिवारी सांगितलं की, "कोरोनाचा हा स्ट्रेन खूप सहजरित्या आणि वेगानं हवेत पसरतो. या स्ट्रेनचा करोना विषाणून तासभर हवेत जिंवत राहू शकतो. श्रीलंकेत मिळालेल्या आतापर्यंतच सर्व कोरोना स्ट्रेनमध्ये हा सर्वात धोकादायक आणि वेगानं संक्रमीत करणारा विषाणू आहे."

हेही वाचा: "कोविशिल्डची किंमत माफकच"; लस महाग असल्याच्या चर्चांवर 'सीरम'चं स्पष्टीकरण

गेल्या आठवड्यात श्रीलंकामध्ये झालेल्या नववर्षाच्या उत्सवापासून कोरोनाचा हा ननीव स्ट्रेन पसरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे तरुणांना या स्ट्रेनच्या विषाणूनं सर्वाधिक संक्रमीत केलं, असल्याची भिती श्रीलंका आरोग्य विभागाला आहे. आरोग्य आधिकारी उपल रोहाना म्हणतात, 'पुढील दोन-तीन आठवड्यात याचं संक्रमण आधिक प्रमाणात होऊ शकतं. त्यामुळे श्रीलंकामध्ये कोरोनाची तिसरी लाटही येऊ शकते.'

हेही वाचा: भारत बायोटेकनं जाहीर केली 'कोव्हॅक्सिन'ची किंमत; सीरमच्या लसीपेक्षा आहे दुप्पट दर

हेही वाचा: नाकावाटे दिली जाणार लस, जाणून घ्या भारत बायोटेकच्या लसीबद्दल

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीलंकामध्ये 31 मे पर्यंत निर्बंध लावले जाणार आहे. यापूर्वी संक्रमीत रुग्णांमधील लक्षणं स्पष्ट नव्हती. त्यामुळे संक्रमण आधिक प्रमाणात झालं अन् कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वेगानं झाला आहे. आता तरुणांमध्येही कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वेगानं पसरत आहे. त्यामुळेच देशात 31 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य आधिकारी उपल रोहाना यांनी दिली.