'भारत-पाकमध्ये युद्ध झाले तर अंतिम युद्ध असेल'

वृत्तसंस्था
Thursday, 20 August 2020

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर ते रक्तरंजित आणि अंतिम युद्ध असेल. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर ते अणुयुद्ध होईल, अशी गरळ पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी ओकली आहे. शिवाय, भारताविरूद्ध अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे.

कराचीः भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर ते रक्तरंजित आणि अंतिम युद्ध असेल. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर ते अणुयुद्ध होईल, अशी गरळ पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी ओकली आहे. शिवाय, भारताविरूद्ध अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे.

सार्वजनिक 'पारदर्शक' शौचालयाचा वाढता वापर...

शेख रशीद अहमद हे अनेकदा भारताविरोधात वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. यावेळी भारताविरूद्ध अणुबॉम्ब वापरण्याची धमकी देताना म्हणाले, पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहे, त्याची क्षमता आसामपर्यंत पोहोचण्याची आहे. तसेच, या अणुबॉम्ब हल्ल्यांमध्ये मुस्लिमांचे नुकसान होणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर ते रक्तरंजित आणि अंतिम युद्ध असेल. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर ते अणुयुद्ध होईल. मुस्लिमांचे प्राण वाचवताना आमचे हत्यार त्या भागांना लक्ष्य करू शकते. पाकिस्तान आसामपर्यंत लक्ष्य करू शकते.'

शवगृहात ठेवलेला मृतदेह उठून बसला अन् लागला पळू...

दरम्यान, शेख रशीद अहमद यांनी यापूर्वीही अनेकदा धमकीची विधाने केली आहेत. भारताचे नाव न घेता अणु युद्धाची धमकी दिली होती. शिवाय, युद्ध पारंपारिक मार्गाने होणार नाही, तर अणु युद्ध होईल, असेही  म्हणाले होते. पाकिस्तानकडे 125 ग्रॅम आणि 250 ग्रॅम वजनाची लक्ष्यभेदी अण्वस्त्रे असून, एका विशिष्ट लक्ष्यावर मारा करू शकतात, असेही म्हटले होते. काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून विधान केले होते. भारत हा आता धर्मनिरपेक्ष देश नाही, तर तो धर्माचा देश बनला आहे, असे ते म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pak railway minister sheikh rashid threats india says pakistan use atom bomb case war