Video: इमरान खान, हे पोर काय म्हणतंय जरा ऐका!

Video: इमरान खान, हे पोर काय म्हणतंय जरा ऐका!

इस्लामाबाद : भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्ताना सातत्याने काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करत आहे. प्रत्येकवेळी पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देशात लक्ष्य केले जात आहे. पण, इमरान खान यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या गर्दीत एक व्हिडिओसध्या लक्षवेधी ठरत आहे. या व्हिडिओमध्ये एका सोळा, सतरा वर्षाच्या पोराने पाकिस्तानचे काश्मीर विषयीचे धोरण काय असायला हवे? पाकिस्तानने कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे? याविषयी सल्ला दिला आहे. सध्या पाकिस्तानात या मुलाला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

भावना भडकवण्याचे काम
पाकिस्तानमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून सर्वसामान्यांच्या भावना भडकवण्याचे काम सरकार करत आहे. सरकारने शुक्रवारी दुपारी बारा ते साडे बारा अर्धा तास काश्मीरच्या एकतेसाठी उभे राहण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तानातील सर्व रस्त्यांवरील वाहतूक त्याकाळात थांबवण्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणी पाकिस्तान आणि काश्मीरचे राष्ट्रगीत ऐकवून काश्मीरच्या जनतेविषयी भावना व्यक्त करण्यात आल्या. यावरून सध्या पाकिस्तानात दोन मतप्रवाह आहेत. काहींनी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. तर काहींनी अशाने काश्मीरप्रश्न सुटणार नसल्याचे म्हटले आहे. या मुद्द्यावर स्नानिक न्यूज चॅनेलसाठी एका तरुण पोराने प्रतिक्रिया दिली आहे. कोवळ्या वयातील या पोराचं विश्लेषण आणि त्याला देशाच्या आर्थिक परिस्थितीची असणारी समज कौतुकास्पद आहे.

आधी आर्थिक प्रश्न सोडवा
व्हिडिओ बाईटमध्ये त्या मुलाने म्हटले आहे की, भारताशी जगातील अनेक देशांचे व्यापार संबंध आहेत. या व्यापार संबंधांच्या जोरावर भारत इतर देशांवर दबाव टाकत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीत खूप मोठी तफावत आहे. जोपर्यंत पाकिस्तान भारताशी आर्थिक पातळीवर बरोबरी करत नाही तोपर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करता येणार नाही आणि तोपर्यंत हा मुद्दा सोडवताही येणार नाही. जगातील कोणताही देश पाकिस्तानसाठी भारताशी त्यांच्या व्यापार संबंधांचा बळी देणार नाही. त्यामुळे आता पाकिस्तानने आता अर्थव्यवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यावे. त्यानंतर बलुचिस्तान, काश्मीरसारखे विषय हाती घेता येतील.’

काय आहे पाकिस्तानची अवस्था?
पाकिस्तानात सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. एक लिटर दूध १२० रुपयांहून जास्त किमतीला विकले जात आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असून गावेच्या गावे शहरांकडे धावू लागली आहेत. सरकारच्या तिजोरीतील खजिना संपत आला असून, पंतप्रधान इमरान खान यांच्यावर सरकारी निवासस्थानातील महागड्या कार आणि जनावरे लिलावात काढण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने सरकारी विश्रामगृहे सामान्यांसाठी खुली केली असून, त्यातून मिळणाऱ्या पैशांनी सरकार तिजोरी भरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com