esakal | उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातील आगीची 'झळ' मुंबईला बसणार?
sakal

बोलून बातमी शोधा

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातील आगीची 'झळ' मुंबईला बसणार?

उरुणमध्ये ओएनजीसीचा गॅस प्रोसेसिंग प्लँट आहे. त्याला सकाळी आग लागली होती. या आगीत गॅसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मुंबई शहराला प्रमुख्याने याच प्लँटमधून सीएनजी आणि एलपीजी पुरवठा होतो. या आगीमुळे आता या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातील आगीची 'झळ' मुंबईला बसणार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई :  उरणमध्ये ओेएनजीसीच्या प्रकल्पाला आज सकाळी आग लागली आहे. सकाळी सात वाजता लागलेली ही आग जवळपास पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आली आहे. उरुणमध्ये ओएनजीसीचा गॅस प्रोसेसिंग प्लँट आहे. त्याला सकाळी आग लागली होती. या आगीत गॅसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मुंबई शहराला प्रमुख्याने याच प्लँटमधून सीएनजी आणि एलपीजी पुरवठा होतो. या आगीमुळे आता या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

रोहित पवार म्हणाले आता बस झालं; शरद पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर

आगीत चौघांचा मृत्यू
उरणमधील ओएनजीसी प्रकल्पाच्या आगीत चार जाणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला आगीत तीन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती होते. तर आग शवण्याच्या प्रयत्नात अग्नीशमन दलाच्या दोघा जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सीआयएएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात सीआयएएसएफच्या तीन जवानांचा समावेश आहे. आगीत काहीजण गंभीर जखमी झाले असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

हवाई दलात दाखल झाले अपाची हेलिकॉप्टर; जाणून घ्या वैशिष्ट्ये

चंद्रकांतदादांची इच्छा काय आहे? : उदयनराजे

मुंबईच्या गॅस पुरवठ्यावर परिणाम?
उरण नगरपालिकेसह जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), पनवेल नगरपालिका यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे लोण अनेक किलोमीटरवरूनही दिसत होते. त्यामुळे उरण शहरात काही काळ भीतीचे वातावरण होते. ओएनजीसी प्रकल्पापासून काही अंतरावर असलेल्या नागरी वस्तीतून नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान या आगीच झळ मुंबई आणि नवी मुंबई शहराला बसण्याची शक्यता आहे. ओएनजीसीच्या या प्रकल्पातूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबईला सीएनजी गॅस आणि एलपीजी पुरवठा होतो. शहारतील बहुतांश रिक्षा या सीएनजीवर धावत आहेत. तर, लोकसंख्येची घनता जास्त असल्याने एलपीजीची मागणीही मोठी आहे. ओएनजीसी प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे पुढचे काही दिवस सीएनजी आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मुंबई आणि नवी मुंबईत सीएनजी आणि एलपीजी तुटवडा जाणवण्याची भीती आहे.

loading image
go to top